हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख):
दि.१३,शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष अजुन मजबुत करण्यासाठी दि.१२ जुलै ते २४ जुलैच्या दरम्यान शिवसंपर्क अभियान सुरु करण्याचे आदेश सर्व जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.त्या आदेशानुसार सेनगाव शहरात दि.१२ जुलै सोमवार रोजी या अभियानाचा सुरुवात केली असुन यावेळी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोषदादा बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसंपर्क अभियानाची सेनगावात पक्ष प्रवेशाने धडाक्यात सुरुवात झाली आहे.
हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष सेनगावचे व्यापारी अशोकराव सरनाईक(मेजर),काँग्रेसचे नेते पंडीतराव(नाना)देशमुख, सुकळीचे माजी सरपंच विजय ठोंबरे शिंदेफळचे विजय लोथे,अनिल चव्हाण,सचिन मुळे,अमोल मुळे,संतोष मुळे,बाबुराव लोथे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोषदादा बांगर यांनी सर्व प्रवेश कर्त्यांना शिवबंधन बांधुन अधिकृत प्रवेश देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी हिंगोली जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे,तालुकाप्रमुख संतोष देवकर,शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख,युवासेना जिल्हाप्रमुख बाजीराव सवंडकर,उप जिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे,नगरसेवक रामभाऊ कदम,सरपंच रामप्रसाद घुगे,जि.प.सदस्य फकिरा मुंढे,नंदकिशोर खिल्लारे,गोपु पाटील,खासदार हेमंतदादा पाटील यांचे सहाय्यक गजानन थळपते,संदीप सोमाणी,देविदास पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

