कोरोगांव । प्रतिनिधी (नामदेव भोसले):-
कोरोना महामारी च्या काळात सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र एक करून आपली सेवा देणारे खरे देवदूत डॉक्टर , पोलीस, पत्रकार ,कोरेगांव तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना अखिल भारतीय वारकरी मंडळ कोरेगांव यांच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री.जोतिराम बर्गे पोलीस उपनिरीक्षक ,डॉ गणेश होळ, डॉ राजन काळोखे , डॉ प्रतिभा जाधव, डॉ नितीन कौलंगे, पांडुरंग बर्गे उपसंपादक सकाळ, ह.भ.प नामदेव भोसले पत्रकार , मोहन घाडगे पत्रकार, विठ्ठल उर्फभाऊसाहेब नलवडे धनसंतोष साप्ताहिक कोरेगांव ,विशेष सन्मान यल्लापा बिराजवार शेतकरी, तसेच नगरपंचायत कोरेगांव सर्व कर्मचारी यांचा सन्मानपत्र शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. राजन काळोखे व सौ पत्नी यांचा सत्कार करताना अश्रू अनावर झाले सर्वच डॉक्टर पत्रकार नगरपंचायती कोरेगांव कर्मचारी यांनी सुद्धा आमचा पहिलाच सत्कार, सन्मानित असल्याने आम्हाला अजून काम करण्याची इच्छा शक्ती वाढली आहे.आकस्मिक सन्मानामुळे सर्वांच्या चेहर्यांवर हसू फुलले होते.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार माळवदे महाराज ,अमोल कदम उपाध्यक्ष , रमेश नाळे कोषाध्यक्ष ,चंद्रकांत लंवळे मुख्य सचिव, मंदिर,नामदेव भोसलेसचिव मंदिर समिती बांधकाम , परशुराम सुतार सचिव दिंडी समिती, बाळासाहेब बर्गे , प्रदिप लोहार, नामदेव यादव सरपंच शिंरबे,लव्हराज चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, शामराव शेडगे मा.बी.डी.ओ., संग्राम जाधव, विनायक चव्हाण,संतोष अडसूळ,सचिन सुतार आदि वारकरी उपस्थिती होते.

