मंगळवार दिनांक १३ रोजी राहुरी शहर येथील शाहूनगर परिसरात डॉ. गायकवाड यांच्या घरी त्यांचा मुलगा घरात किचन च्या बाहेर काही वस्तू घेण्यासाठी गेला असताना त्याला एक छोटा साप आढळून आला तेव्हा त्याने आपल्या वडिलांना ही खबर दिली असता डॉ. गायकवाड यांनी राहुरी येथील सर्पमित्र व वन्यजीव प्रेमी "कृष्णा पोपळघट" यांच्याशी संपर्क साधून त्यांना घरात साप असल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोपळघट व त्यांचे सहकारी मुजीब देशमुख हे क्षणाचा ही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सापाला बघितले असता ते "नाग" जातीच्या सापाच पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. पोपळघट यांनी त्या पिल्लाला पकडताच भिंतीच्या कडेला असलेल्या छोट्याश्या जागेतून अजून एक पिल्लू बाहेर आले त्यामुळे घरातील लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली. त्यानंतर पोपळघट यांनी आपली शक्कल लढवून एका मागे एक असे तब्बल ६ नागाचे पिल्लं बाहेर आली. त्या सगळ्या पिल्लांना पकडून ताब्यात घेण्यात आले. आणि गायकवाड कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला
त्यानंतर पोपळघट यांनी घरातील सदस्य व परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला कारण इथे एखाद्या नागिणीने अंडी दिली असून आणखीन पिल्लं देखील निघतील असा अंदाज व्यक्त केला व हे जरी पिल्ल असले तरी ते एका मोठ्या नागा इतके च ते सुद्धा जन्मजात विषारी असतात याची कल्पना देऊन या नंतर देखील जर पिल्ल आढळलि तर दिसताक्षणी आम्हाला फोन करावा असे सुरक्षेच्या दृष्टिने आवाहन केले.
पकडलेली सर्व पिल्लं ही जंगलात सोडून देण्यात येतील , तसेच आता पावसाळा सुरु असल्यामुळे लोकवस्तीत तसेच आपल्या आवतिभोवती सर्प, नाग आढळुन येतात तर कृपया कोणीही मुक्या प्राण्यांना मारू नये हवं तर मला बोलवा मी कधीही कुणाचाही फोन आला तर त्याच क्षणी रात्र आहे का दिवस घड्याळ न बघता मी त्या ठिकाणी हजर असतो. एक असे सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी यावेळी सांगितले.
"तसेच महिना भरपूर्वी माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब यांनी त्यांना स्व. खर्चाने सुरक्षा किट देऊन त्यांनीं एका जखमी नागाचे ऑपरेशन करून त्याचा जीव वाचविला होता. त्याबद्दल सत्कार देखिल केला होता आणि पुढील काळात त्यांनी असेच त्यांचे हे कार्य सुरु ठेवावे अशा शुभेच्छा देखिल दिल्या होत्या."
_बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600_

