shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोल्हापूर, सांगली, चिपळूण, महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी..कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अवाहन..!

कोल्हापूर, सांगली, चिपळूण, महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी..कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अवाहन..!

केले

         इंदापूर: (२४ जुलै २०२१)   गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागात जोरदार पावसाने सुरवात केली असून सांगली,कोल्हापूर, चिपळूण,महाड या भागात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्याने तसेच अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्याने अनेक नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे. अनेक गावे उदवस्त झाली आहेत. त्यांना यातून सावरण्यासाठी मदतीचा हात देऊन माणुसकी दाखवणे हाच माणुसकी धर्म आहे. आपल्या  अश्या आपत्कालीन परिस्थितीत नेहमी मदतीचा हात गरजवंतांना   इंदापूरकर देत असतात.
 राज्यमंत्री पालकमंत्री  दत्तात्रय  भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने २०१९ रोजी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुरावेळी तेथील अनेक गावांना मदत केली होती. 

       यावेळी देखील कोल्हापूर सांगली, चिपळूण,महाड या भागातील नागरिकांना  मदत करण्यासाठी अन्न-धान्य, गरम कपडे,ब्लॅंकेट,पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून पाण्याचे जार, औषधे, दुध,चटई, बिस्कीट,खाण्याचे टिकाऊ पदार्थ, रोगराई पसरू नये म्हणून आवश्यक फवारणी यंत्र इत्यादीची आवश्यकता असून  शक्य तेवढी मदत घेऊन जाणार असून आपण सुद्धा मोठ्या मनाने मदत करावी आणि ह्या कार्यात आपण सुद्धा सहभागी होऊन माणूसकीचे दर्शन घडवावे ही नम्र आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,कार्याध्यक्ष अतुल झगडे,  
अनिकेत भरणे ,संस्थापक अध्यक्ष कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांनी.
close