shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगड जिल्हा न्यायालयाचा महाड पुनर्वसन करता एक मदतीचा हात..!!

प्रतिनिधी: विनया मेढेकर :
महाड :-निसर्गाच्या रौद्ररूपा पुढे आपण नेहमीच सगळेच हतबल होत असतो. त्याचे जिवंत उदाहरण महाराष्ट्रात बघायला मिळतात आहे. मुंबई, चिपळूण,सांगली,कोल्हापूर याच प्रमाणे महाडमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या शहर आणि गावांना पुराचा इतका फटका बसला आहे की, होत्याच नव्हतं झाले आहे. अनेकांची आयुष्याभराची कमाई गेली आहे.जनजीवन विस्कळित झाले आहे.घरदार वाहून गेले आहे, संसार पार उध्वस्त झाले आहेत.

 अश्यातच रायगडच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय इंगळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथील पूरग्रस्तांना 1200 पाण्याच्या बॉटल व 10 बॉक्स बिस्कीटचे पुडे मदत म्हणून तहसील कार्यालय माणगाव येथे जमा करण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्तांना सध्या जास्त  गरज असणारी चादर व बेडशीट मदत म्हणून देण्याचे आदरणीय इंगळे मॅडम यांनी सुचविले होते.

त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी यानी  सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व न्यायिक अधिकारी यांच्या वतीने महाड येथील पूरग्रस्तांना अल्पशी मदत म्हणून 80 नग बेडशीट व 80 नग चादर तहसील कार्यालय महाड येथे देण्यात आले.तसेच महाड न्यायालय येथे कार्यरत व महाड येथे राहणाऱ्या व जे पुरामुळे बाधित आहेत अशा कर्मचाऱ्यांना 20 नग चादर व 20 नग बेडशीट देण्यात आले.

महाड पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन :

आज माणुसकीच्या नात्याने आपण यांच्या पाठीशी उभे राहून  पूरग्रस्तांना परिस्थितीशी सामना करण्यासाठी एक मदतीचा हात देण्याची गरज आहे.आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून मोठी मदत आपण त्यांना करू शकणार आहोत.महाड पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी वस्तूरूपी किंवा आर्थिकस्वरूपात  सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन  रायगड जिल्हा न्यायालयातर्फे करण्यात आले आहे.
close