15 लक्ष रूपयांच्या विकासकामांचा विजयकांत मुंडेंच्या हस्ते भूमीपूजन शुभारंभ...
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून विडा जि.प.गटातील विकासकामांसाठी भरीव निधी मिळाल्याने विडा गटातील गावांचा विकास करणे शक्य झाल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी बुरंडवाडी,कोरडेवाडी,लिमूनदरा येथिल १५ लक्ष रूपयांच्या विकासकामांच्या भूमीपूजन शुभारंभा प्रसंगी केले आहे.
केज तालुक्यातील विडा जि.प.गटात लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आसून येथिल जनतेने कायमच स्व.गोपिनाथरावजी मुंडे साहेबांना कणखर साथ दिली आहे.स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांच्या अकाली निधनानंतर देखिल येथिल जनता लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.या भागातील विकासकामांसाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी विविध योजनेतून भरीव निधी दिला आहे.गुरूवारी सकाळी 9 वा.बुरंडवाडी येथिल (भोसले वस्ती) ३ लक्ष नळकांडी पुलाचे बांधकाम करणे,सकाळी १० वा.विडा लिमुनदरा जोड रस्ता सुधारणा करणे १० लक्ष रूपये,११ वा.कोरडेवाडी (कानिफनाथ वस्ती) रस्ता सुधारणा करणे अशा एकूण १५ लक्ष रूपये किंमतीच्या कामाचा भूमीपूजन शुभारंभ विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला आसून माजी ग्रामविकास मंत्री तथा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी विडा जि.प.गटातील विडा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 5 कोटी 85 लक्ष रूपये,विडा पशुवैद्यकीय दवाखण्याची ईमारत,लव्हुरी येथिल पशुवैद्यकीय दवाखान्याची ईमारत,जि.प.गटातून जाणारे प्रमुख जिल्हामार्ग,राज्यमार्ग,वस्ती रस्ते,25/15 योजनेतून गावा अंतर्गत रस्ते,समाजकल्याण योजनेतून भरीव निधी,राष्ट्रीय पेयजल योजनेसह अन्य पाणीपुरवठा योजना,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने विडा जि.प.गटातील विकास करणे शक्य झाल्याची प्रतिक्रीया जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना दिली आहे.प्रसंगी विड्याचे युवा सरपंच सुरज पटाईत,कोरडेवाडीचे सरपंच बाबासाहेब कोरडे,उपसरपंच संतोष यादव,जेष्ठ नेते अशोक वाघमारे,अभिमान पटाईत,विठ्ठल भोसले,विड्याचे ग्रामपंचायत सदस्य डॉ.धनराज पवार,अंकुश कलाणे,कोरडेवाडीचे ग्रा.पं.सदस्य दत्ता गित्ते,हानुमंत दुनघव,उत्रेश्वर यादव,समाधान गिरी,आशोक भोसले,सज्जन भोसले बजरंग भोसले,दत्ता गिते,समाधान गिरी,विनोद यादव,दादाराव राख,संजय गिरी,जनार्दन यादव,हानुमंत यादव,गिते सर,आश्रुबा बप्पा वरपे,हानुमंत जाधव,मदन यादव,रामभाऊ राख,दत्ता यादव,तुकाराम नागरगोजे,उध्दव गित्ते,बाळासाहेब राख,खंडू गित्ते,माणीक राख,चंद्रशेन नागरगोजे,बप्पा बर्दापूरकर,रामभाऊ नागरगोजे,पोपट राख,सोमिनाथ नागरगोजे,डीगांबर भोसले,बारीक भोसले,आत्माराम भोसले,गोविंद भोसले,लिंबा ढोबळे,बापू भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

