शिंगवेनाईक येथील 85 वर्षीय महिला कुटुंबासह करतेय आमरण उपोषण..!!
प्रतिनिधी । संजय वायकर:
शिंगवेनाईक : (दि .३) : नगर तालुक्यातील शिंगवेनाईक या गावातील इंदुमती डोळस (वय 85 ) त्यांच्या कुटुंबासह घराजवळील वहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी दि . २ जुलैपासून लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषणास बसले आहे .
मागील दोन वर्षापासून शिंगवेनाईक ग्रामपंचायत कार्यालयाकडे डोळस कुटुंब त्यांच्या घराकडे येण्या - जाण्यासाठी अतिक्रमण करण्यात आलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी पाठपुरावा करत आहे .
उपोषण सुरु केल्यानंतर ग्रामपंचायत मार्फत या घटनेची दखल घेवु असे सांगण्यात येत आहे . मग इतके दिवस ग्रामपंचायत काय झोपा काढत होती का ?असा संतप्त सवाल उपोषणकर्ते घनशाम डोळस विचारत आहेत . या घटनेची उपोषणाची वरिष्ठ पातळीवर दखल न घेतली गेल्यास आत्मदहनाचा इशारा ही घनश्याम डोळस यांनी दिला आहे .
हे आमरण उपोषण अनिकेत डोळस , इंदुमती डोळस , घनशाम डोळस आणि कुटुंबीय करत आहेत .
शिंगवेनाईक ग्रामपंचायत चे ग्रा.पं. सदस्य श्री .अमोल डोळस यांनी या उपोषणास जाहिर पाठिंबा दिला आहे .
तसेच चर्मकार सेवा संघ चे जिल्हाअध्यक्ष श्री .खामकर साहेब यांनीही या उपोषणास भेट देवून घटनेची पूर्ण माहिती घेतली .
पंचायत समिती नगर, मा .तहसिलदार साहेब नगर, जिल्हाधिकारी साहेब नगर यांना लेखी तक्रार अर्ज देऊन सदर घटनेची कल्पना व माहितीही देण्यात आली आहे .
तरी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा अशी डोळस कुटुंबाने अपेक्षा व्यक्त केली .

