एरंडोल - येथील आनंदनगर परिसरात डी. जे. मनु जळगाव प्रस्तुत शेजारीन सखुबाई या अहिराणी गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. यात अहिराणी चित्रपट तोंडाय आक्का फेम विद्याताई अग्रवाल आणि तूना प्यार मा पागल व्हायनाये फेम मयुरी साळुंखे यांची प्रमुख भूमिका आहे.
सदर गाण्याचे यशस्वी चित्रीकरणासाठी केवलसिंग राजपूत, कुलदीप राजपुत यांनी परिश्रम घेतले. लवकरच हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे केवलसिंग राजपूत यांनी सांगितले. यावेळी राजेश पाटील, कुलदीप पाटील, रवींद्र मराठे, सागर पाटील, शरद मराठे, भरत महाले, जितेंद्र चौधरी, नाना पाटील, सुनील वानखेडे,भिला पवार यांचे सह आनंदनगर आणि परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपसस्थित होते.

