shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लष्करी आळीच्या वाढत्या प्रादुर्भावर बीज प्रक्रिया फायदेशीर: अमृता शिर्के

लष्करी आळीच्या वाढत्या प्रादुर्भावर बीज प्रक्रिया फायदेशीर: अमृता शिर्के


फोटो:कृषिकन्या अमृता शिर्के वडापुरी पंधारवाडी येथे मार्गदर्शशन करताना.

इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी (पंधारवाडी)येथील शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यकमाचे नियोजन करण्यात आले असुन शेतकऱ्यांना शेती उपयुक्त माहिती तसेच विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.सध्याच्या काळात वडापुरी व आसपासच्या परिसरात लष्करी आळीसाठी पोषक वातवरण असुन तीची वाढ झपाट्याने होत आहे,हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीपुर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 
इंदापुर तालुक्यातील वडापुरी गावातील रहिवासी रत्नाई कृषी महाविद्यालयातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूज येथील कृषीकन्या अमृता लालासाहेब शिर्के यांनी बिजप्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन  केले.
येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी पीकसंरक्षणासाठी जेवढे महत्व  आहे, तेवढेच महत्व बीज प्रक्रियेस द्यावे.इमिडीक्लोप्रिड,सायनट्रॅनीलीप्रोल,थायमीथोक्झ्याम इ .यांसारख्या कीटकनाशकांचा वापर साधारणतः 30 ते 40  ग्रॅम किंवा मिली प्रति दहा किलो बियांसाठी करावा.या प्रमाणेच विविध जैविक व भौतिक बीज प्रक्रियांचा वापर करुन लष्करी आळीचा प्रादूर्भाव कमी होऊ शकतो.बीजप्रक्रियेमुळे सुलभ पेरणी,रोग नियंत्रण खर्चात बचत,त्याप्रमाणेच बियाणांचा दर्जा वाढला जाऊन बाजार भाव चांगला मिळतो ,अशी माहिती शिर्के यांनी दिली .
अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील ,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी .कोरटकर , प्राचार्य आर .जी .नलावडे, कार्यक्रम समन्वयक एस. एम .एकतपुरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा .एस. आर. आडत, प्रा .ए.बी .तमनार,विषय तज्ञ प्रा.डी.एस ठवरे ,प्रा.डी.पी.बरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिपूरक उपक्रमाची माहिती देण्यात आली.
यावेळी श्रीकांत पवार, नवनाथ शिर्के,दत्तात्रय शिर्के,किशोर पवार,संतोष शिर्के,तुषार पवार व इतर शेतकरी उपस्थित होते.
close