shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एटीएम टारगेट; गॅस कटरच्या सहाय्याने महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले..!!

पिंपरी चिंचवड:- गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. मात्र चोरट्यांना एटीएममधून रोख रक्कम चोरता आली नाही. ही घटना आज शुक्रवारी (दि. 30) दुपारी तीन वाजताच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथे उघडकीस आली.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगर भोसरी येथे बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आहे. या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. मात्र, चोरट्यांना मशीनमधून रोकड चोरता आली नाही.

दुपारी तीन वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
close