पुणे:-पीएमपीएल चालकाचा खून करुन मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हांडेवाडी – कात्रज बायपास याठिकाणी आज (रविवारी) सकाळी हा उघडकीस आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
गौतम मच्छिंद्र साळुंखे (29, रा. पापडेवस्ती, ढमाळवाडी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरूण पीएमपीएल चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे यांनी काल (दि. 10 जुलै) रोजी स्वारगेट ते धायरी या मार्गावर ड्युटी करून बस रात्री पावणे दहाच्या दरम्यान डेपोत जमा करून ड्युटी पूर्ण केली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह कात्रज बायपास या ठिकाणी आढळून आला. गौतम साळुंखे यांच्या खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

