shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खाजगी पदविकाधारक पशुवैदयकिय व्यवसायीक संघटनेचे आ.लंके यांना साकडे..!!

विवीध मागण्या संधर्भात आ.लंके यांना दिले निवेदन..!!

अहमदनगर प्रतिनिधी : रफिक शेख
खाजगी पदविकाधारक पशुवैद्यकीय संघटनेच्या विविध विविध मागण्यांसंदर्भात तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना निवेदन देत त्यांच्या व्यथा व्यक्त केल्या .व शासन दरबारी मागण्या मान्य नाही झाल्या तर पत्राद्वारे काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून दिला . 
        

लघु सर्व खाजगीपशुवैदयकिय सेवा पुरविणाऱ्या लोकांवर निबंधक एम. एस. व्ही. सी. यांचेकडून विनाकारण नाहाक बदनामी व त्रास देत आहेत. संविधानाने भारतीय पशु वैदयक कायदा सन १९८४ च्या कलम ३० (ख) व कलम ५७(१) या बाबतीत दुर्लक्ष करुन व वर्तमानपत्रात चुकीची माहिती प्रसारित करुन आमची बदनामी करण्यात येत आहे. यासाठी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करुन देखील कोणतीही दखल किंवा खुलासा केला जात नाही. तरी सर्व खाजगी लघु पशुवैदयकिय सेवा पुरविणारे बांधव दि. २२/०७/२०२१ पासून मागण्या मान्य होई पर्यंत काम बंद आंदोलन करणार आहेत.
        
सदर निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या य आहेत

१) खाजगी पदविकाधारक पशु वैदयकिय व्यक्ती यांना भारतीय पशु वैदयक परिषद कायदा सन १९८४ च्या कलम ३० (ख) अर्हता धारण करणाऱ्या पशु वैदयकिय व्यक्तींना राज्य शासनाने तातडीने Minor veterinary Serivses साठी नोंदणीकृत परवान्याची व्यवस्था करावी.
२) पदविकाधारक, बेरोजगारी प्रमाण वाढत असल्याकारणाने विविध खाजगी तसेच शासकीय विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करा
३) महाराष्ट्रात भारतीय पशु वैदयक परिषद सन १९८४ कायदयात
पदविकाधारकां साठी दुरुस्ती करण्यास महाराष्ट्र राज्यातील पशुधन
हित लक्षात घेऊ केंद्र सरकारला प्रवृत्त करावे.
४) पदविकाधारक यांचेसाठी शेती व शेतकरी आयोगचे अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी शिफारस केलेली National Live Stock Development Council ची स्थापना करुन पदविकाधारक नोंदणीकृत करण्यात यावे.
५) महाराष्ट्र राज्य शासनच्या सन २००९ च्या अधिसूचनेतील २२ कामे नोंदणीकृत पशु वैदयकांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली करण्याची अट शिथिल करावी शेड्यूल H ड्रग स्वतंत्रपणे खरेदी करणे, साठवणे व वापरणे याची तरतुद करण्यात यावी.
६) पशु संवर्धन विभागातील पशु वैदयकिय दवाखाने श्रेणी अपग्रेड करुन श्रेणी १ करणे बंद करावे. २ चे
पशु संवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदावर पदवीधर न भरताफक्त पदविकाधारकचं भरण्यात यावे.
८) सन २०१५ पासून पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडून ३ वेळेस भरती काढून बेरोजगार युवकांकडून ३ परिक्षा शुल्क लाटले, परंतू आज तागायत एकही पद भरले नाही यावर तात्काळ निर्णय घ्यावा कंत्राटी भरती करु नये.
९) राज्य सरकार अखात्यारित तसेच जिल्हा परिषद, पशु संवर्धन विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे. १०) पशु संवर्धन पदविकाधारक, बेरोजगार युवकांना शासनाने किमान
१० लक्ष रुपयांचे कर्ज पशुपालन किंवा डेअरी व्यवसायाकरिता
उपलब्ध करुन दयावे.
११) पशु पालकांना वाडी, वस्ती, डोंगरदऱ्यात अडचणींचा सामना करुन पदविकाधारक सेवा देत असतो. त्यामुळे गाव तेथे पशुवैदयक ही शेती व शेतकरी आयोगाची संकल्पना शासनाने राबवावी.
१२) शासनाला वेळोवेळी लसीकरण, टॅगीन, पशुगणना, कृत्रिम रेतन यासारख्या मोहिमेत सहकार्य करुन सुद्धा बोगस म्हणून बदनाम होणारा पदविका अभ्यासक्रम तात्काळ बंद करावा.
१३) भारतातील इतर राज्याच्या धरतीवर पदविका अभ्यासक्रम हा १२ वी पास विज्ञान शाखा वर किमान ३ वर्षोचा असावा.
१४) कृत्रिम रेतन करण्याचा अधिकार १० वी पास व्यक्तींना न देता केवळ पशुसंवर्धन पदविकाधारक व्यक्तींनाच असावा.
१५) पशु संवर्धन विभागाने कृत्रिम रेतन करणाऱ्या खाजगी पदविकाधारक व्यक्तींची नोंदणी बंद केलेली ती तात्काळ चालू करावी .
१६) शासकीय पशु दवाखान्यात असलेले शिपाई तसेच ड्रेसर सर्रास कृत्रिम रेतन, लसीकरण व उपचार करतांना दिसतात ते त्वरीत थांबविण्यात यावे.
१७) तसेच कोव्हीड १९ या साथीच्या आजारात या खाजगी पदविकाधारकांच्या कामाचे योगदान पाहून फ्रान्टलाईन हेल्थ वर्कसचा दर्जा दयावा.
        

या सर्व मागन्या शेतकऱ्यांच्या व खाजगी पदविकाधारकांच्या हितार्थ संघटनेच्या वरील सर्व मागण्या मान्य करण् पशुवैद्यकीयच्या वतीने आमदार निलेश लंके यांना डॉ. योगेश शेळके, डॉ. शिंदे, डॉ.सोमनाथ सोबले, डॉ. बापूसाहेब गोरडे, डॉक्टर शरद शेळके, डॉ .बाबासाहेब गांगड, डॉ. सचिन जाधव, डॉ. योगेश गागरे, डॉ. विशाल गागरे , डॉ.स्वानत हारदे , डॉ. विक्रांत गाजरे, डॉ. प्रसाद झावरे, डॉ अरुण झावरे, डॉ.महेश मापारी , डॉ. उद्धव जाधव, डॉ . रामानंद गागरे , डॉ . शुभम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते .
close