वडापुरी पंचायत समिती गणात १९ लाखाचा निधी मंजूर..
पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी: (३० जुलै २०२१)पुणे जिल्हा नियोजन मंडळाकडून इंदापूर तालुक्यातील वडापुरी पंचायत समिती गणात १९ लाख रुपयांचा शाळा दुरुस्ती व अंगणवाडी इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शहा येथील प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी २ लाख रुपये तसेच शहा येथील महादेवनगर येथील अंगणवाडीसाठी इमारती साठी ८ लाख ५० हजार रुपये, गलांडवाडी नंबर २ येथील अंगणवाडी इमारतीसाठी ८ लाख ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे यांनी दिली.

