shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यात पावसाचे जोरदार पुनरागमन..!!

अचानक आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांची उडाली तारांबळ...

प्रतिनिधी : संजय वायकर

अ . नगर (दि . ८ ) : साधारण एक महिन्या पासून प्रतिक्षेत असलेला पाऊस आज नगरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बररसला.


नगर शहर आणि तालुक्यात आज झालेल्या पावसाने प्रतिक्षेत असलेला शेतकरी मात्र सुखावला . लांबणीवर पडलेल्या पेरण्या आता लगेचच सुरु होतील . पुन्हा शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येईल.

नगर शहरात मात्र अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली . आधीच प्रशासनाने दिलेली ४ वाजेपर्यंतची वेळ असल्याने याचवेळी आलेल्या पावसाने व्यापारी हवालदिल झाले .

नगर तालुक्यात मात्र शेतीच्या कामांना वेग येणार आहे . शेतकरी वर्ग सुरु झालेल्या पावसाने आनंदी झाला असून यामुळे शेती संबंधीत विक्री मालाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे .
close