कोरोना मुळे लग्न तसेच इतर समारंभ साध्या पद्धतीने करणे गरजेचे.. राजवर्धन पाटील
इंदापूर: (दि.१ जुलै २१)कोरोना चा धोका टळलेला नसून आजही इंदापूर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने काळजी घेऊन आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्याची गरज आहे.
कोरोना मुळे लग्न तसेच इतर समारंभ साध्या पद्धतीने करणे गरजेचे आहे. असे मत नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी भाटनिमगाव येथे व्यक्त केले. दिनांक १ जुलै रोजी एका लग्न सोहळ्या निमित्ताने भेट देण्यासाठी ते आज आले होते.
यावेळी सरपंच अजित खबाले, विजय शिंदे, जयवंत बागल उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजवर्धन पाटील म्हणाले की ,कोरोना काळात अनेक लोकांचे व्यवसाय बुडाले असून मंडप व्यवसायिक’ घोडे मालक’ डेकोरेशन’ साऊंड सिस्टिम इत्यादी लोकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यांनी व्यवसायासाठी घेतलेले कर्ज वाढत गेले आहे त्याचे हप्ते फेडणे अडचणीचे असल्याने शासनाने त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
कोरोना काळात आपल्या जवळचे नातेवाईक हितचिंतक मित्र अनेक लोक आपल्याला सोडून गेले. त्यांची न भरून येणारी हानी झाली आहे. परंतु हा काळ जास्त दिवस राहणार नाही मानवी जीवन पुन्हा पूर्वपदावर येइल थोडी वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे

