सरडेवाडी येथे निलावती ॲग्रो इंटरप्राईजेस चे उद्घाटन समारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी या गावात शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांनी आपल्या अनुभवातून आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शेती प्लॉट सह कृषी सल्ला व शेतकऱ्यांना सर्व प्रकारची शेती औषधे, बी-बियाणे ,रासायनिक खते, कीटकनाशके विद्राव्य खते व तन नाशके योग्य दरात मिळावेत म्हणून निलावती ॲग्रो इंटरप्राईजेस याची उभारणी करून त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन सामान्य प्रशासन राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शनिवार दि. १० जुलै रोजी ४ वाजता उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, सचिन खामगळ,सुभाष दरंगे, सागर पवार, शरद उंबरे, सरपंच सिताराम जानकर, उपसरपंच हनुमंत जमदाडे,माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी व ग्रामस्थ मित्रमंडळी उपस्थित होते.
या उद्घाटनाप्रसंगी राज्यमंत्री भरणे म्हणाले की, निलावती ॲग्रो एंटरप्राइजेसची सेवा केंद्र आजपासून सर्वांसाठी सुरू झालेले आहे .माळी कुटुंब या भागातल्या शेतकऱ्यांसाठी निलावती ॲग्रो इंटरप्रायजेस च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सेवा देतील. तसेच पहिल्यापासून हे कुटुंब शिक्षकी पेशातील असल्याने त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार आहेत. शेतीमध्ये नवनवीन शेती पिके घेऊन उत्तम प्रकारे पीक उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न कसे मिळेल हा शेतकऱ्यांचा उद्देश असतो या उद्देशा प्रमाणे अक्षय माळी आणि विवेक माळी त्यांच्या सेवा केंद्रातून भविष्यात येथील शेतकऱ्यांना चांगली सुविधा मिळवून देतील. अक्षय यांचा स्वभाव चांगला असल्यानेच सर्व मित्र नातेवाईक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत.
यावेळी सरडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच उपस्थित असल्याने त्यांनी विकास कामाची काळजी करू नका ते सगळं माझ्या वरती सोडून द्या असाही उद्गार काढले.निलावती ॲग्रो इंटरप्राईजेस चे उद्घाटन झाल्याचे स्पष्ट करून माळी कुटुंबीयांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थितांचे अक्षय माळी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल ऋण व्यक्त करून आभार मानले.

