आज (दि.२६)पारगाव मौला ता.नगर येथील अमरधाम सुसज्ज आणि भव्य-दिव्य पद्धतीने उभे राहीले असुन याठिकाणी सर्व सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत,नगर पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र भापकर यांच्या निधीतुन अमरधाम कामासाठी २.५० लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे, मा.उपसभापती रविंद्र भापकर यांनी अमरधामची पाहणी करून उर्वरित कामासाठी अजूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच डॉ.बोठे,शिवाजी बोठे,धर्मा बोठे,सुनील बोठे,अर्जुन बोडखे,नवनाथ बोठे,भगवान बोडखे,लक्ष्मण बोडखे,भाऊ पांडुळे,पंढरीनाथ खेडकर,रमेश खेडकर,वैभव बोठे व आदी मान्यवर उपस्थित होते,यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ आणि मा.उपसभापती रविंद्र भापकर यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.
भापकर यांनी गुंडेगाव गणातील प्रत्येक गावात विविध कामासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे,व्यक्तिगत लाभाची अनेक कामे मार्गी लावली आहेत,त्यामुळे सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण झाली आहे ,राहिलेल्या कालावधीत अजून गणासाठी मोठा निधी उपलब्ध करून गुंडेगाव गणाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशिल राहणार असल्याचे रविंद्र भापकर यांनी सांगितले.

