shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोराना योद्ध्यांचे कार्य अतुलनीय हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिपादन*

*
कोराना योद्ध्यांचे कार्य अतुलनीय हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिपादन*

     *

इंदापूर प्रतिनिधी-
   इंदापूर पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये सागा फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तसेच अखिल भारतीय स्वस्त धान्य संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद दामोदरदास मोदी  यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.यावेळी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
  सागा फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर धापटे, मुख्य संयोजक महेंद्र रेडके यांनी इंदापूर येथील पंचायत समिती सभागृहामध्ये  इंदापूर तालुक्यात कोरोनाजन्य परिस्थितीत उत्कृष्ट काम केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय कृषी, प्रशासकीय व पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांना  कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    प्रल्हाद मोदी म्हणाले की,' गनिमी युद्धाची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती  कोविड-19 च्या या संसर्गाला परतून लावण्याचे कार्य देखील महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या धैर्याने केले आहे.
   हर्षवर्धन पाटील यांनी प्रल्हाद मोदी यांचा व्यक्ती परिचय करून दिला तसेच त्यांनी यावेळी कोरोना महाभयंकर संकटात कोरोना योद्ध्यांचे कार्य अतुलनीय असल्याचे म्हटले.
   विजयकुमार परीट - गटविकास अधिकारी इंदापूर पंचायत समिती,डॉ.संदेश शहा - पत्रकारिता, राजकुमार बामणे – गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती इंदापूर,अमोल इंगळे - प्रशासकीय सेवा बाभूळगाव,नानासाहेब खरात -सामाजिक सेवा खोरोची,संभाजी कैलास रेडके -कृषी क्षेत्र पडस्थळ,हनुमंत जाधव-संचालक,कर्मयोगीशंकररावजी पाटील सह.साखर कारखाना लि.बिजवडी, कुमार शिंदे - उद्योजकता,शिरसोडी,नामदेव करे - सरपंच कळाशी, विजयकुमार फलफले – निवेदक, क्षेत्र गलांडवाडी नं.1,गणेश घाडगे - रुग्णसेवा निमगाव केतकी.,डॉ.संजय शिंदे पशुधन विकास अधिकारी, प्राजक्ता फडतरे शिक्षीका,ना.रा हायस्कूल इंदापूर, रूपाली झगडे - शिक्षिका ना.रा.हायस्कूल इंदापूर यांना यावेळी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
       यावेळी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे,शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,गटनेता कैलास कदम,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,महेंद्र रेडके,अमोल इंगळे,माजी नगरसेवक
पांडुरंग शिंदे,गोरख शिंदे,राजकुमार जठार,हर्षवर्धन कांबळे आदी उपस्थित होते.
close