shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरडेवाडी येथे निलावती ॲग्रो एंटरप्राइजेसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची भेट..!

सरडेवाडी येथे निलावती ॲग्रो एंटरप्राइजेसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची भेट..!
इंदापूर: (दि.१९ जुलै २०२१)इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील निलावती ॲग्रो एंटरप्राइजेस ला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांची (दि.१९ जुलै ) रोजी सकाळी ११ वाजता भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सरडेवाडी येथील विवेक माळी व इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष अक्षय माळी यांच्या निलावती ॲग्रो एंटरप्रायजेस या नव्यानेच सुरू करण्यात अलेल्या कृषी सेवा केंद्रास  राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांनी या वेळी अक्षय माळी व त्यांच्या सदस्यांनी निलावती एंटरप्रायजेस या कृषी सेवा केंद्राची उभारणी केली आहे. त्यास  शुभेच्छा दिल्या. 
 यावेळी त्या  म्हणाल्या की, कोरोणा काळामध्ये अनेक युवक बेरोजगार झाले असून त्यांनी खचून न जाता त्यांनी
अशा व्यवसायांनकडे प्रोत्साहित व्हावे.  अक्षय माळी या युवकांने या व्यवसायाची निवड करून नुकतेच चालू करून कौतुकास्पद कार्य केले आहे निश्चितच अशा पध्दतीने युवकांनी नवनवीन उद्योग व्यवसाय यांची उभारणी करून आपले जिवन यशस्वी करावे.
यावेळी सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक दीपाली ताई पांढरे, महाराष्ट्र राज्याच्या महिला उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र महिला निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीताई शेवाळे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्याध्यक्ष अतुल झगडे, उपाध्यक्ष माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  अंबादास वाघमारे,सरडेवाडी सरपंच सिताराम जानकर, माळी सेवा संघ राज्य संघटक ज्ञानदेव शिंदे, माळी सेवा संघ इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, निलावती ॲग्रो इंटरप्राईजेस चे व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष अक्षय माळी, भारत माळी, नागनाथ माळी, नंदाताई माळी आणि युवक मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
close