shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनई दरंदले वस्ती अनेक वर्षा पासून रस्त्या विना वंचित..!!

अनेक वेळा तक्रारी करूनही सोनई ग्रामपंचायतचे  दुर्लक्ष..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर:
सोनई--गेल्या अनेक वर्षापासुन मागणी करूनही प्रलंबित असलेल्या सोनई ग्रामपंचायत हद्दीतील लांडेवाडी रोडवरील दरंदले वस्ती रस्त्याची पावसामुळे अंत्यत दुरावस्था झाली आहे.


सोनई ग्रामपंचायत पावसाळात आला तरी साधा मुरूम पण टाकत नसल्याने पावलोपावली चिखलातुन चालताना शब्दाची लाखोळी वाहली जात असताना कुणीही याकडे ढुंकुन पण पाहत नसल्याने  नाराजीची भावना तयार झाली आहे.या लांडेवाडी रोडवरील दरंदले वस्तीवरील रस्त्याचे पक्के  काम सोनई ग्रामपंचायतने लवकरात लवकर पुर्ण करावे अन्यथा तात्पुरते मुरूमीकरण करून दयावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांच्या वतीने होत आहे.

सोनई ग्रामपंचायतचा प्रभाग तीन व प्रभाग चार मध्ये विभागला गेलेला दरंदले वस्ती रस्ता दरवेळेस पावसाळाने खराब होतो.तसेच रोज मोठे चारचाकी वाहने गेले कि रस्तावर प्रंचड मोठे खड्डे पडुन रस्ता चिखलाने गाळमय होवुन जातो.

मोटारसाईकल,सायकल आणि पायी चालणारे नागरिकांची तर चालताना तारेवरील कसरत असते.त्यात या चकारीच्या खड्डात एखादा वेळेस पाय घसरून एखादी वृद्ध व्यक्ती पडली तर वाईट अवस्था तर होतेच पण शाररिक दुखापत पण होते.सोनई ग्रामपंचायत मध्ये गेल्या पंचवार्षिकच्या कार्यकाळात या तीन नंबर वार्डाच्या कार्यकुशल  सरपंच व सदस्य यांना पण वेळोवेळी मागणी व पाठपुरावा केला असता निधीची कमतरता असल्याचे कारण सांगत दुर्लेक्ष करण्यात आले होते.या निवडणुकीत तीन नंबर प्रभातील दरंदले वस्ती भाग हा दोन प्रभागत विभागला गेला आहे.

त्यात महसुल यंञणेच्या अजब कारभाराने एकाच घरातील एक मतदार तीन नंबर प्रभागत व दुसरा चार नंबर प्रभागात यामुळे हा दरंदले वस्ती भाग प्रभाग क्रमांक तीन व प्रभागात क्रमांक चार या दोन प्रभागात विभागला आहे.यामुळे या दरंदले वस्ती भागाला तब्बल पाच ग्रामपंचायत सदस्य व दोन प्रभाग लाभले आहेत.या तीन व चार प्रभागात पाच ग्रामपंचायत सदस्य असतानाही मागणी करूनही कुणीच याकडे लक्ष देत नाही.निवडणुकीच्या वेळेस मते मागायला येणारा प्रत्येक उमेदवार म्हणायचा मला एक संधी दया निवडुण आल्यावर तुम्ही हक्काने काही कामे सांगा असे गुळपीठ लावुन सांगणारे हे सदस्य भपारे तर मारत नव्हते ना अशी शंका सुज्ञ नागरिकांना वाटत आहे.

यातील काही ग्रामपंचायत  सदस्याना खाजगीत कामाबाबत मागणी केली असता त्यांनी आपल्या नाराजीच्या सुरात प्रतिक्रिया देताना भाऊसाहेब  आमचे कुठलेच काम ऐकत नाही.भाऊसाहेब व तीन चार सदस्यच सारे कामकाज पाहतात आम्हाला साधा मुरूम टाकायचा पण अधिकार नाही.यामुळे आम्ही महिला ग्रामविकास अधिकारी आणण्याबाबत मागणी वरिष्ठाकडे मागणी करणार आहोत अशी प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर खाजगीत ग्रामपंचायत सदस्याने दिली.सध्या पावसाळा सुरू झाला तरी काही ठिकाणी नाल्या तुंबल्या गटार बंद पडली.गल्लीबोळातील रस्तात गटार साचले.वस्त्यावरील रस्त्याची दुरावस्था झाली.पण सोनई ग्रामपंचायतचे पदाधिकारी व सदस्य नागरी समस्याकडे लक्ष देत नाहीत.

यामुळे जिल्हात मोठे नावरूप असलेल्या सोनई  ग्रामपंचायतने जनतेला फक्त  मुलभुत सुविधा तरी पुरवाव्यात अशी प्रतिक्रिता जनतेतुन व्यक्त होत आहे.
close