नगर ता.-प्रतिनिधी । रफिक शेख:
निवडणूक संपली,राजकारण संपलं,विरोध संपला,आता सर्व गाव पुढाऱ्यांनी एकत्र राहुन गावच्या विकासासाठी योगदान दिल पाहिजे,गावात असणाऱ्या विविध समस्या ग्रामपंचायतच्या माध्यमातुन सोडवण्यावर भर दिला पाहिजे,सत्ता कोणाची आहे यापेक्षा आपण सत्तेवर का आहोत याचाच विचार केला पाहिजे,जनतेने टाकलेला आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवता आला पाहिजे,सामाजिक आणि वैयक्तिक कार्यक्रमात हजेरी लावून विकास करता येत नसतो त्यासाठी विकासाच्या योजना माहिती असाव्या लागतात,तालुका व जिल्हास्तरावर सातत्याने पाठपुरावा करावा लागतो,गावातील आपापल्या प्रभागातील घरकुले,पाणी समस्या,विज समस्या यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे,जनतेच्या समस्या विचारात घ्यायला हव्यात,जनतेने निवडुन दिलेला.
लोकप्रतिनिधी हा जनतेच्या हिताचा असला पाहिजे,पूर्वीच्या सत्तेतील मागे राहीलेली कामे आणि नवीन कामे मोठ्या जोमाने गावात उभी राहिली पाहिजेत,गावाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा,गावात एकमेकांची सुख दुःख जपण्यासाठी आपण कायम तत्पर राहतो तसेच मोठया विकास कामासाठी एक दिलाने एका मनाने संघटीत व्हा!जनतेला,समाजाला सोबत घेऊन चला,माता भगिनिंचे संरक्षण दिन दुबळ्यांना आधार देण्यासाठी ठोस पाऊले उचला! स्वार्थासाठी नाही तर निस्वार्थीपणे समाजाची सेवा करण्यासाठी समाजाला अपेक्षित असणारे निर्णय घ्या! तुम्हाला काय अपेक्षित यापेक्षा समाजाला काय अभिप्रेत आहे याचा सर्वांगीण विकास करा,एकंदरीत राजकारण बाजूला ठेवून समाजजकारणावर विश्वास ठेवून कार्य करा,पण शेवटी राजकारण येतच शेवटी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्यावर भर द्या! असे मत प्रसिद्धीपत्रकाद्वारे युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष. मा.युवराज खटके यांनी मांडले.

