shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येवला येथे राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..!!

येवला-(प्रतिनिधी-संतोष राऊळ)

दि. 28 ऑगस्ट 2021 रविवार रोजी येवले शहरातील श्रीगोरक्षनाथ मंदिर येथे राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

        




यावेळी सकाळी गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी कृष्णा राऊळ, उर्मिला राऊळ व वैष्णवी राऊळ यांचा युवक संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन समाजातील विश्वस्त व जेष्ठांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.संतोष राऊळ, अर्जुन राऊळ, बाळनाथ भालारे, शरद राऊळ व राकेश राऊळ यांनी 12वी नंतरच्या पुढील शैक्षणिक कारकीर्द व वाटांबद्दल मार्गदर्शन केले तर समाजातील जेष्ठ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षणाचे महत्व पटवून देत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष मोडवे यांनी केले.

        

सदर कार्यक्रमास राऊळ  समाजाचे उपाध्यक्ष अंबादास राऊळ, खजिनदार बळीराम राऊळ व सदस्य संजय राऊळ,दत्तात्रय राऊळ,कैलास राऊळ,बाळनाथ राऊळ उपास्थित होते.तर युवकांमध्ये शिवाजी राऊळ, अतुल भालारे,दिपक राऊळ,दत्तात्रय नरवडे,कुणाल भालारे,रमेश राऊळ,महेश राऊळ, वाल्मिक राऊळ, धनंजय राऊळ,प्रभुदास राऊळ, बापू राऊळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राऊळ समाज युवक संघटनेच्या युवकांनी अथक परिश्रम घेतले.

close