shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाहन चोरी व जबरी चोरी सारख्या 25 गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट निघालेल्या गुन्हेगारास पनवेल गुन्हे शाखा कक्ष २ कडून अटक..!!


विनया मेढेकर । पनवेल :-
शहरात मोठ्या प्रमाणात वाहन चोरी व जबरी चोरीचे प्रकार वाढत आहेत. हे गुन्हेगार एवढे सराईत असतात की ते पोलिसांच्या हाती लागत नाही.. अशाच एका गुन्हेगारास  मिळालेल्या  गुप्त माहितीच्या आधारे पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2  कडून अटक करण्यात आली आहे.कळंबोली, खारघर, पनवेल, रबाळे, मुंब्रा, भिवंडी सारख्या विविध पोलीस ठाण्यात 25 जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक वॉरंट निघलेल्या या गुन्हेगाराचे आत्तापर्यंत जबरी चोरीच्या गुन्ह्यांसह सहा इतर गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.

बरेच दिवसांपासून पोलीस या गुन्हेगारांचा शोध घेत होते. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग,अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी वाहन चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते., त्यानुसार सहा.पोलीस आयुक गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे  शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतुत्वाखाली शोध घेत असताना पो.उप.नि. मानसिंग पाटील व पो.ह.सूर्यवंशी यांना मिळालेल्या  गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी येथील नामे अब्बास शब्बर जाफरी वय 34 वर्ष रा. खान कंपाऊंड, शांती नगर भिवंडी यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने कळंबोली, खारघर, पनवेल, रबाळे, मुंब्रा, भिवंडी यातील गुन्ह्यांची कबुली दिली.

 या गुन्ह्यात त्याच्याकडून जबरी चोरी केलेले सर्व मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली . या आरोपी विरुद्ध विविध पोलिस ठाण्यातील 25 गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहेत त्याची बजावणी प्रलंबित आहे. सदर कारवाई पथकामध्ये स .पो. नि. प्रविण फडतरे,गणेश कराड,पो.उप.नि वैभव रोंगे,स फो.साळुंखे, पो.ह.गडगे, इंद्रजित कानू,रूपेश पाटील,दीपक डोंगरे,प्रफूल मोरे,प्रशांत काटकर, अनिल पाटील,संजय पाटील,सचिन पवार,सचिन म्हात्रे,वाघ,सुनील कुदले,प्रवीण भोपी हे सहभागी होते.
close