इंदापूर तहसील व इंदापूर पोलीस ठाण्याची संयुक्तरीत्या कारवाई... अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या दोन यांत्रिकी बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त .
इंदापूर : प्रतिनिधी( जुलै २०२१) रोजी उजनी पाणलोट क्षेत्रातील गंगावळण ते कालठण नं. १ गावापर्यंत च्या हद्दीत उजनी जलाशयातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या ४० लाख रुपये किंमतीच्या दोन यांत्रिकी बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. इंदापूर पोलीस ठाणे व इंदापूर तहसील यांनी ही संयुक्तरीत्या ही कारवाई केली असल्याची माहिती इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.
सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व तहसीलदार अनिल ठोंबरे यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस शिपाई अमोल गारुडी, समाधान केसकर, राजू नवले,अर्जुन भालसिंग,पोलीस पाटील राजेंद्र शिंदे,अरुण कांबळे ,संजय राऊत, महसूल विभागाचे तलाठी सहभागी झाले होते.
वाळू माफियांवर धडक कारवाई चालू असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले.

