शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
कै.गेणुजी नाना भालेराव यांच्या स्मरणार्थ भूषण संजय भालेराव तसेच ग्रीन फाउंडेशन यांच्या वतीने ५१ औषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. कै. गेणुजी भालेराव यांनी जीवनभर संघर्ष करत समाज्यासाठी व गावा साठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. ३ - ७ - २१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ लोणी काळभोर वनविभाग हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा नजीकच्या कोळपे वस्ती येथे विविध औषधी व जंगली वृक्षाचे रोपण करण्यात आले.
या वेळी ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती ग्रामस्थ, जनाई शिक्षण संस्था,विभा गिरिश ट्रस्ट, भालेराव परिवार उपस्थित होते. या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, तसेच भूषण भालेराव, जीवन जाधव, अभिषेक शेंडगे, राज चव्हाण, राहुल कुंभार, किरण बाचकर, किरण भोसले, संदीप ननवरे, बिरूदेव भास्कर, उपस्थित होते. यावेळी कै. गेणुजी भालेराव यांना ग्रीन फाउंडेशन यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.


