shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कासोदा गावाला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला भरघोस निधी.. जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन माने यांचा ही सहभाग.....!!

   एरंडोल :- तालुक्यातील कासोदा येथे 13 ऑगस्ट शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 95 लाख व जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन माने यांच्या जिल्हा परिषद फंडातून 25 लाखाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाल्याच गुलाबराव जी पाटील यांनी बिर्ला चौक येथे झालेल्या जाहीर सभेत जाहिर केले .या सभेच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील होते सदर सभेस संबोधित करताना पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी कासोदा येथील येथील पाण्याच्या प्रश्नाबाबत सांगितले की कासोदा येथे सुरू असलेल्या अकरा कोटी च्या मुख्यमंत्री पेजल योजना बाबत  कासोदा ची जनता सध्या सध्या पाणी पाणी करत आहेत. म्हणून मी संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आलो आहे आठ दिवसात सादर पाण्याचे टेस्टिंग पूर्ण होई ल टेस्टिंग झाल्यानंतर जी अपूर्णता राहील त्याच्यामध्ये मी आपले आमदार चिमणराव पाटील दोघे मिळून कासोदा चा पाणी प्रश्न सुटत नसेल तर मी योगायोगाने या खात्याचा मंत्री आहे महाराष्ट्राचे मला माहित नाही पण जळगाव आणि कासोदा चे निश्चित काम केले पाहिजे .सदर योजनेचे टेस्टिंग झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या लक्षात येईल आपण पाण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय नाही त्यातून काही त्रुटी असतील तर सध्या ही योजना अपूर्ण पडत असेल तर शासनाने जल मिशन नावाची नवीन योजना सुरू केली आहे त्यात केंद्रान 50 टक्के राज्याने 50 टक्के रक्कम व नेत्रा फिटिंग च्या एरिया यामध्ये दहा टक्के या दरावर ही योजना सुरू केली आहे .या योजनेमध्ये आपल्याला फायदा नाही झाला तर निश्चितपणे आपल्या विभागात नवीन जरी पाणी योजना करायची म्हटली तरी पहिली पाण्याची योजना नवीन फीडबॅक पाहून त्याच्यावर आपण पुढचे काम करणार आहोत.                                                              सध्या पाण्याने चांगलीच उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्यामुळे दोन-चार दिवसात पाऊस नाही आला तर जळगाव जिल्हा दुष्काळी जाहीर करावा लागेल असेही त्यांनी येथे आवर्जून सांगितले त्यानंतर त्यांनी अनेक विकासात्मक कामांच्या बाबतीत, मतदारसंघ बदलल्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर सदर सभा आयोजित करण्यात आल्यामुळे  चौफेर फटकेबाजी करत सभा चांगलीच गाजवली.                                              त्यानंतर अध्यक्षीय भाषणात आमदार चिमणराव पाटील यांनी सदर पाणी पुरवठा योजनेबाबत तीन वर्षापासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजना अनेक त्रुटी तुन सदर योजना चालू आहे सदर योजने बाबत अंजनी धरणात स्तोत्र असले तरच योजना चालू राहील अन्यथा अंजनी धरण भरले नाही तर योजना चालू शकत नाही ,असे त्यांनी सांगितले तरी त्यासाठी गिरणा धरण वरून पर्यायी व्यवस्था करावी लागेल हे त्यांनी सांगितले मागील महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयात या योजनेसंदर्भात अधिकार्‍यांची बैठक बोलावून अधिकाऱ्यांची कानउघडणी आमदार साहेबांनी केली होती सदर योजनेबाबत या वेळेसही त्यांनी  उघड नाराजी व्यक्त केली मागील काळात आमच्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण झाला होता ते राजकारण आहे असे राजकारणात सुरूच असते भावाभावांमध्ये असे प्रसंग घडत असतात त्यामुळे आता आमच्यात असा कुठलाच दुरावा नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी प्रमुख महानंदा ताई पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख हर्शल माने यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू बंगाळे ,नाना भाऊ महाजन ,रमेश महाजन, हिम्मतराव  पाटील ज्ञानेश्वर आमले ,वासुदेव पाटील , जगदीश पाटील किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी ,दिलीप रोकडे, संजय पाटील गबजी पाटील, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार शिवसेना अध्यक्ष व सरपंच महेश पांडे यांनी केले सूत्रसंचालन गोकुळ शिंपी व दत्तू मराठे, निलेश अग्रवाल यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दगडू चौधरी संदीप मराठे संग्राम तांदळे सोनू शेलार रमेश जमादार शैलेश पांडे स्वप्नील बी याणी अमोल भाई बंटी चौधरी अनिल चौधरी आदींनी परिश्रम घेतले तर आभार शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी मानले
close