shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विठ्ठल कदम यांची वडापुरी ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड.

विठ्ठल कदम यांची वडापुरी ग्रामपंचायत उपसरपंच पदी   निवड.
इंदापूर प्रतिनिधी: (२७ ऑगस्ट २०२१)
वडापुरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी विठ्ठल नारायण कदम यांची उपसरपंच निवडीच्या आयोजित सभेमध्ये  बिनविरोध निवड (दि.२७) रोजी करण्यात आली.
 वडापुरी ग्रामपंचायतचे उपसरपंच अश्विनी दत्तात्रय गायकवाड यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा  दिला होता व तो मंजूर करण्यात आला होता. यामुळे आज (दि. २७ ऑगस्ट २०२१) रोजी वडापुरी ग्रामपंचायत उपसरपंच निवडीच्या सभा सकाळी १०:०० वाजता घेण्यात आली होती. 
,
त्यानुसार  नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ सकाळी १०:०० ते १०:३० पर्यंत देण्यात आली. यानंतर सदर अर्ज छाननी व नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची वेळ सकाळी १०:०० ते १०:४५ पर्यंत देण्यात आली. परंतु सदर उपसरपंच निवडणूक सभेत  विठ्ठल नारायण कदम यांचा एकच अर्ज आला असून तो छाननीमध्ये वैध ठरला. सदरचा अर्ज दिलेल्या वेळेत प्राप्त झाला असून कोणत्याही सदस्यांनी अर्ज भरलेला नाही. त्यामुळे माघार घेण्याच्या वेळेत दुसरा कोणाचाही अर्ज प्राप्त नसल्यामुळे माघार घेण्याचा सुद्धा उपस्थित मुद्दा झाला नाही. सदर उपसरपंच निवडणूक प्रक्रियेमध्ये  विठ्ठल नारायण कदम यांचा एकवीचार झाला असून तो वैध ठरल्याने त्यांची ग्रामपंचायत वाडापुरी  उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. असे या सभेचे अध्यक्ष सरपंच संगीताताई तरंगे व ग्रामविकास अधिकारी यांनी जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायत वडापुरी चे सरपंच संगीता तरंगे, माजी उपसरपंच  अश्विनी दत्तात्रय गायकवाड, आनंद सर्जेराव चंदनशिवे, अमोल सदाशिव पवार, विठ्ठल नारायण कदम, रेखा प्रकाश करगळ, अंबिका शत्रुघन बागल, शोभा प्रताप बागल , वैशाली संजय खामगळ, पांडुरंग शंकर पिंगळे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

उपसरपंचपदी विठ्ठल कदम यांची निवड झाल्यानंतर ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने भैरवनाथ ट्रस्ट चे अध्यक्ष हनुमंत जगताप, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी तरंगे, दत्तात्रय गायकवाड, संभाजी पवार, प्रकाश करगळ, दादा जगताप, सुनील पिंगळे, प्रताप बागल, मंगेश माने ,दीपक पासगे ,बी आर चंदनशिवे, बाबुराव जगताप, सुभाष पवार, संजय खामगळ, दीपक पिंगळे, नालंदा चंदनशिवे, इत्यादी उपस्थित यांनी कदम यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
close