श्री साईभक्त लक्ष्मी ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायतीस वृक्षांचे दान करून त्यांचे रोपण..!!
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
श्री साईभक्त लक्ष्मी ट्रस्टच्या विश्वस्त संगीता गायकवाड यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यादिनी सावळी विहीर खुर्दच्या ग्रामपंचायतीस वृक्षांचे दान व रोपण करून दरमहा ४५ वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती साई नाईन ग्रुपचे साईराज गायकवाड यांनी दिली. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून न भुतो न भविष्यति असा समारंभ सावळी विहीर खुर्द गावच्या जि. प. शाळेच्या भव्य प्रांगणात विविध वृक्षांच्या साक्षीने गावातून शाळेपर्यंत वृक्षदिंडी काढून, श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट, शिर्डी व साई ९ ग्रुपच्या वतीने शाळेत व गावात भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. जो झाड लावतो तो एक आशा लावतो असा संदेश मुलांना देत वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले असून वृक्ष लागवड साईभक्त श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्यावतीने निरंतर सुरू राहणार असल्याची स्पष्टोक्ती ट्रस्टच्या संचालिका संगीता गायकवाड यांनी दिली. यावेळी गावातून शाळेपर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली होती.
याप्रसंगी ट्रस्टच्या संचालीका संगीता गायकवाड, साई नाईन ग्रुपचे संचालक साईराज गायकवाड, स्नेहल गायकवाड, यशराज गायकवाड, यश राजपूत, किरण पारखे, सावळविहिर खुर्दचे सरपंच अशोकराव जमधडे, सपनाताई वर्पे, उपसरपंच महेश जमधडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय क्षीरसागर, शरद भदे, सुधाकर चव्हाण, माजी सरपंच संदिप आरणे, सुधीर वर्पे, श्रीमती टेमक, ग्रामसेविका श्रीमती सांगळे, मुख्याध्यापक संजय त्रिभुवन, विलास आगलावे, दत्तात्रय खंडिझोड, संदीप गाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

