shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मीकांत लाड यांचा वाढदिवस साजरा..!!

                                                          ___                                          

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                    =============================================                            

केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व रमेश आडसकर यांचे खंदे समर्थक लक्ष्मीकांत लाड यांचा वाढदिवस केज पंचायत समिती उपसभापती ऋषीकेश आडसकर यांच्या उपस्थितीत केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती केज येथे साध्य पद्धतीने साजरा करण्यात आला.                           

यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. लक्ष्मीकांत लाड हे रमेश आडसकर यांचे खंदे समर्थक म्हणून केज तालुक्यात प्रसिद्ध आहेत. त्याच्या कडे केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी रमेश आडसकर यांच्या सुचनेनुसार अनेक शेतकरी कल्याण कारी योजना राबविण्यात पुढाकार घेतला आहे. त्यामुळे केज तालुक्यातील  शेतकरी वर्ग समाधानी आहे.                            

आज त्यांचा वाढदिवस केज पंचायत समिती उपसभापती ऋषीभैया आडसकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन साजरा करण्यात आला. यावेळी साळेगावचे सरपंच कैलास पाटील, सुरेश कांबळे सर, नगरसेवक शिवाजी हजारे, शकिलभैया सय्यद, पत्रकार प्रकाश मुंडे, केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य अरूण धपाटे, बाळासाहेब भाकरे,दत्तात्रय पावले, दादासाहेब ससाणे,संतोष देशमुख,बंडु गव्हाणे,सुधाकर इंगळे,केज तालुका मार्केट कमेटी सचिव संतोष देशमुख व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वर्षारोपण देखील करण्यात आले.                             



यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पंचायत समिती उपसभापती ऋषीभैया आडसकर यांनी लक्ष्मीकांत लाड यांना   पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.                               


                 

लोकनेते रमेश आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली  केज तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना  तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती केज मध्ये लागु करण्यासाठी मी  कटीबद्ध आहे.    

 __   लक्ष्मीकांत लाड केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती.                   




close