(रोप - वे मंजुरीसाठी पर्यावरण मंत्र्यांना निवेदन, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा रोप वे असणार.)
🚩भाविकांना निसर्गरम्य गर्भगिरी डोंगरदऱ्यातून हवाई सफर करत, निसर्गाचा आनंद घेत दोन्ही नाथांचे सुलभपणे दर्शन घेण्यासाठी दोन्ही देवस्थानला जोडणारा ‘रोप-वे’ (हवाई मार्ग) साठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कानिफनाथ गड मढी येथून चैतन्य मच्छिंद्रनाथ गड (मायंबा) दरम्यानचा रोप-वे शासनाने मंजूर करावा असे पत्र दोन्ही देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळामार्फत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. याबाबतची माहिती देवस्थानचे अध्यक्ष तथा मढीचे सरपंच संजय मरकड यांनी दिली.
मढी व मायंबा देवस्थानच्या संयुक्त विद्यमाने दहा राज्यापैकी सर्वांत लांब ३ किमी अंतर असलेला व महाराष्ट्रातील सर्वात मोठा रोपवे बांधला जाणार आहे. याबाबत मढी येथे मढी देवस्थान व मायंबा देवस्थान ची संयुक्त बैठक संपन्न झाली यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, उपसरपंच रवीद्र आरोळे, विश्वस्त अँड. शिवजीत डोके, मायंबा देवस्थान चे अध्यक्ष दादासाहेब चितळे, बाबासाहेब म्हस्के, नवनाथ म्हस्के सावरगाव सरपंच राजेंद्र म्हस्के आदी उपस्थित होते .
यावेळी बोलताना संजय मरकड म्हणाले की, मढी ते मायंबा घाटमार्ग ६ किमी अंतर पार करण्यासाठी एक तास लागतो. रोप-वे झाल्यानंतर भाविकांना मढी ते मायंबा प्रवासाचे अंतर केवळ विस मिनेटेच इतके कमी होणार आहे. सुमारे ४५ कोटी रुपये खर्चून दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार आहे. मायंबा देवस्थानची उंची जास्त आहे आणि भाविकांना तेथे जाण्यासाठी अत्यंत अवघड असा रस्ता आहे. ही दोन्ही देवस्थाने डांबरी रस्त्याने जोडली गेली तरी सोयीस्कर दळणवळण व्यवस्था नाही.
पर्याय नसल्याने अनेक भाविक मढी वरून सहा किलोमीटरचा घाट रस्ता पायी चालत मायंबाला जातात. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटन या दोन्हीचा संगम येथे आहे. यातून संपूर्ण परिसराचा होणार सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे .
रोप- वे बरोबरच मिळणार या सुविधा
या रोप-वे बरोबरच नाथ आरोग्यालय, भाविक व स्थानिकांच्या आरोग्य तपासणीसाठी डायग्नोस्टिक सेंटर, मंगल कार्यलय, भव्य पार्किग व्यवस्था, गार्डन व नाथ उद्यान, यात्रेकरूसाठी स्वच्छतागृह, नाथ साहित्य उभारणे या सह अनेक विकास कामे आगामी पाच वर्षात हाती घेतले आहेत.
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर मढी देवस्थान व परिसर विकास तिरुपती बालाजीच्या धर्तीवर मढी देवस्थान व परिसर विकास करण्यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्न करत आहे. निधी कमतरतेमुळे भाविकांना पुरेशा सुविधा देताना मढी ग्रामपंचायतीवरही ताण पडत आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे यात्रा कालामध्ये चांगल्या सुविधा यात्रेकरूना देणे व या परिसराचा विकास करणे आदी साठी विकास करण्यात येणार आहे.
लाख रुपयांची देणगी दिल्यास परिवाराला मोफत प्रवास.
"रोपवे उभारणीसाठी जे नाथ भक्त एक लाख रुपये देणगी स्वरूपात योगदान देतील त्यांच्या परिवारातील सदस्याना रोपवे प्रवास विनामुल्य राहील. तसेच कानिफनाथ गडावर दर्शनासाठी व्ही. आय. पी. पास देऊन दर्शनाचा लाभ देण्यात येईल .
या कामासाठी माझ्या हातून नाथ भक्तांची सेवा घडावी ही कानिफनाथांची इच्छा असल्याने देवस्थानच्या अध्यक्षपदी मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे येत्या काळात नाथ भक्ताच्या व देवस्थानच्या या कामासाठी माझ्या हातून नाथ भक्तांची सेवा घडावी ही कानिफनाथांची इच्छा असल्याने देवस्थानच्या अध्यक्षपदी मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे येत्या काळात नाथ भक्ताच्या व देवस्थानच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व अधिकाधिक सेवा पुरवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.
– संजय मरकड, अध्यक्ष, मढी देवस्थान.
Shirdi Express Live#(- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे 📲7350591600*

