shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माळशिरस तालुका ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना देण्यात आला पहिला डोस


प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

  माळशिरस: ( दि. ४) : माळशिरस तालुका ग्रामीण रुग्णालयात आज कोवीडचे ३०० डोस उपलब्ध झाले . १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना आज कोव्हॅक्सीनचा पहिला डोस देण्यात आला .

   डोस घेण्यासाठी लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला . पाऊस चालू असताना देखील कोणतीही घाई गडबड किंवा गर्दी न करता शिस्तीचे पालन करत रांगेत उभे राहून नागरिकानी सहकार्य केले .


   डोस घेण्यापूर्वी प्रत्येकाच्या मोबाईल वरील मेसेज ची नोंद करून घेतली जात होती . प्रत्येकाचे लसीकरण करण्याअगोदर ऑक्सीमीटरद्वारे चेक अप करून नंतर प्रत्येकाला लसीकरण करण्यात आले.


    माळशिरस तालुका ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या माहितीनुसार दुपारी एक वाजेपर्यंत 130 जणांना लसीकरण करण्यात आले.

 संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व 300 डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधीत विभागाने दिली.
close