shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"उद्दिष्टपूर्ती साठी झटून अभ्यास करा.देशाचे नाव उज्वल करा" :उषाताई तनपुरे..!!

"अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या औचित्याने आयोजित केलेला गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा प्रेरणादायी आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्या जोमाने ,नव्या उमेदीने उद्दिष्टपूर्ती साठी झटून अभ्यास करा आणि देशाचे नाव उज्वल करा....!!" असे राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे म्हणाल्या. त्या जागतिक शिक्षक संघाशी संलग्न अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ( महाराष्ट्र शाखा ) , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ , उपशाखा राहुरी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव सोहळा २०२१ या कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. 

                  


 "अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे काम हे प्रेरणादायी आहे. शिक्षकांच्या समृद्धी बरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. ग्रामीण कष्टकरी ,शेतकरी कुटुंबातील या विद्यार्थ्यांचा गौरव इतरांना प्रोत्साहन देणारा ठरेल असा विश्वास वाटतो ....!!" असे या कार्यक्रमाचे  अतिथी राहुरी पंचायत समितीचे सदस्य रविंद्रआढाव म्हणाले. तर "प्रत्येक विद्यार्थ्याने शिकलं पाहिजे ,मिळालेल्या संधीच सोनं केलं पाहिजे. आपल्या समोर चांगल्या संधी आज उपलब्ध आहेत त्यांचा लाभ घेतला पाहिजे." असं पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर म्हणाले. पुरस्काराने प्रेरणा मिळते.विद्यार्थांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे . असे जेष्ठ नेते सुरेश निमसे म्हणाले .

                  

राहुरीतील गाडगे महाराज आश्रम शाळेच्या  सभागृहात, कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राहुरी तालुक्यातील शेतकरी , कष्टकरी , श्रमजीवी , शिक्षक पालकांच्या ७५ गुणवंत पाल्यांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

    

तसेच यावेळी श्रीमती विठाबाई शेटे- वने यांच्या शब्दफुले या पहिल्या कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ही करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश निमसे, जिल्हा शिक्षण समिती सदस्य धनराज गाडे ,अखिल शिक्षक संघाचे राज्य सचिव कल्याण लवांडे , जेष्ठ नेते सर्जेराव राऊत,  राज्य नेते राजेंद्र निमसे , जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम , जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे , जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर , प्रा. महावीर चव्हाण , प्रा. हापसे सर , राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम, संघाचे तालुकाध्यक्ष जनार्धन काळे , ऐक्य मंडळाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पदवीधर जिल्हाधक्ष रज्जाक सय्यद, कोषाध्यक्ष संदिप शेळके, पदवीधर तालुकाध्यक्ष राजाराम वने ,जूनी पेन्शन अध्यक्ष दिनेश टाकसाळ, महिला आघाडी अध्यक्ष सुनिता रणदिवे, रुपाली चांडगे आदी उपस्थित होते. 

                  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर यांनी करतांना , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. तर सर्जेराव राऊत यांनी अखिल प्राथमिक शिक्षक संघाची दैदिप्यमान वाटचाल आणि शिक्षकांच्या समृद्धीकरणातील संघाची भूमिका आपल्या मनोगतात विशद केली. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी तर आभार प्रदर्शन जनार्धन काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश हापसे,संजय तेलोरे , बाबासाहेब चव्हाण, विजय चितळे, नामदेव दातीर ,विश्वनाथ कदम , राजेंद्र शिंदे , नितीन भालेकर, विशाल भोंडवे,  दत्तात्रय बारवेकर, मनोज भापकरआदींनी परिश्रम घेतले. गाडगेबाबा मिशनच्या संचालिका भारती खांडवे यांचे विशेष सहकार्य लाभले .                               

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600

close