shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे फेसबुक ला फेक अकाउंट काढून पैशाची मागणी .

इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे फेसबुक ला फेक अकाउंट काढून पैशाची मागणी .
इंदापूर:   इंदापूर पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे फेसबुक वर फेक अकाउंट काढून आपली तब्येत खराब असून पैसे पाठवावेत अशी मागणी फेसबुकच्या माध्यमातून होत असून याची माहिती पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे.

या बाबत स्वतः पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आवाहन केले आहे की,माझ्या नावाने माझे व माझ्या कुटुंबाचे फोटोचा वापर करून फेसबुकवर कुणीतरी खोटे अकाउंट उघडले आहे, त्यावर पैशाची मागणी केली जात आहे.
माझी तब्येत चांगली आहे मला पैशाची कसलीही गरज नाही.
कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे पाठवू नयेत. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये व सदर अकाऊंट फेक असल्याचा रिपोर्ट मारावा
तसेच इतरांनाही माहिती कळवावी असे आवाहन केले आहे.

इंदापूर तालुक्यात धन्यकुमार गोडसे यांनी प्रशासकीय कामांमध्ये उत्कृष्ट कारवाई करत
 आगळेवेगळे स्थान निर्माण केलेलं आहे .आणि अशातच याच या अधिकार्‍याचे फेसबुक द्वारे फेक अकाउंट काढून पैसे मागणी करणाचे धाडस काही लोक करत आहेत असे धान्यकुमार गोडसे यांचा दावा आहे. आता या फेक अकाउंट करणाऱ्या इसमास लवकरात लवकर अटक व्हावा अशीच इंदापूरकर यांची मागणी आहे.
close