shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात सात दिवसांपासून कृत्रिम पाण्याची टंचाई ! याला जबाबदार कोण..?



वांबोरी : पाइपलाइन फुटल्याने, मोटार बिघाडामुळे, लाईट नसल्याने, पाणी नसल्याने अश्या प्रकारचे अनेक अडचणी वारंवार सांगत राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे गेल्या सात ते आठ दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

वांबोरी येथे मोठी बाजारपेठ तसेच बहुतांश नागरिक हे गावातच वास्तव्य करतात. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव योजनेतील पाण्याचा स्त्रोत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून गावात व वस्तीवर चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. वारंवार योजनेत बिघाड होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणीपुरवठा होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

धरणात पाणी आहे तर वेळेवर वीजपुरवठा नाही. तर वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला तर विद्युत पंप पाणी उपसा करत नाही, तर काही ठिकाणी जलवाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे पाणीपुरवठा करताना नेहमीच अडचणी येत आहे. मात्र, वांबोरी येथील ग्रामस्थांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी वणवण होत असून विकत पाणी घ्यावे लागत आहे. गेल्या सात ते आठ दिवसापासून गावात पाणीपुरवठा न झाल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाल्याने त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीपुरवठा योजनेची थकबाकी वाढत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह घरगुती वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील बंधारे कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजना चालविताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. पाणीपुरवठा समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा दिवसाआड पुर्ण दाबेने सुरू करण्याची मागणी, तसेच वांबोरी गावात अनेक ठिकाणी बंदीस्त गटारी आहेत परंतु योग्य वेळी स्वच्छता न केल्याने गाळ साचून सांडपाण्याचे  व्यवस्थित निचरा होत नाही त्यामुळे साथीचे आजार, डेंग्यू, गोचीड ताप, मलेरिया या आजाराचे पेंशेट सरकारी दवाखाना व खाजगी दवाखान्यात वाढले असून गावकर्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि वांबोरी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांना विचारल्याशिवाय अर्जदाराला पोहच देत नाही, पोहच घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी बोलावतात त्यामुळे तेथे टपाल विभाग सुरू करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम कुसमुडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

काँम्रेड सुनिल दुधाडे, अशोक कुसमुडे, सागर कुसमुडे, नागेश कुसमुडे, विठाबाई आळकुटे, रेश्मा पिटेकर, अश्विनी धनवटे, आशा कुसमुडे, सपना ससाणे, संजय साठे, ताराबाई ससाणे, साक्षी ससाणे, मंगल साठे, बिपीन कुसमुडे, प्रेमनाथ कुसमुडे, देवीदास कुसमुडे, वैष्णवी कुसमुडे, लक्ष्मी वाघमारे, मिना भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या निवेदनात आहेत.
close