शिर्डी शहरात दै साईसंध्याने नेहमीच समाजहित जोपासले - शौकतभाई शेख..!!
शिर्डी (रुपेश पोपटे) -
१५ अॉगष्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्रीसाईबाबांच्या पावनभूमितून प्रकाशित होणारे प्रथम सायंदैनिक साईसंध्या वृत्तपञाचा स्वातंत्र्य दिन विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक दत्ताञय कोते, शिर्डी शहर कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, उपाध्यक्ष सुरेश आरणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शिर्डी शहराध्यक्ष राहुल कुलकर्णी,दत्ताञय ञिभुवन, संजय बनकर,सतीष पठारे , दामोदर उमाप, दै.साईसंध्याचे संस्थापक संपादक शौकतभाई शेख , संपादक अॅड. मोहसिन शेख ,कार्यकारी संपादक राजेंद्र बनकर,राहाता तालुका प्रतिनिधी पंकज भालेराव ,रुपेश पोपटे, देविदास खरात सरताज शेख,राज चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष सचिन कोते यांनी यावेळी साईंच्या नगरीत पुनरागमनाने दै.साईसंध्या वृत्तपञाची नव्याने होणारी सुरवात ही शिर्डीसह पंचक्रोशीतील वाचकांना दिलासा देणारी असुन माध्यमांचा झपाट्याने होणारा बदल पाहता वृत्तपत्रांचे महत्त्व आजही अबाधीत असुन साईसंध्या वृत्तपञास शुभेच्छा दिल्या. सचिन चौगुले यांनी शिर्डीतील विविध प्रश्न आणि त्यासाठी एक राजकीय पदाधिकारी म्हणुन घेतलेल्या भुमिकेस माध्यमांनी नेहमीच न्याय दिला असे सांगत सर्वच माध्यमांचे शिर्डी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान असल्याचे सांगितले. नगरसेवक दत्ताञय कोते यांनी दै. साईसंध्या समुहाने १५ अॉगष्टचे उत्तम औचित्य साधून शिर्डीकरांच्या सेवेत सुरु झालेल्या दै साईसंध्या वृत्तपञास शुभेच्छा दिल्या.
दै. साईसंध्याचे संस्थापक शौकतभाई शेख यांनी १५ अॉगष्टच्या शुभेच्छा देत साईंच्या पावनभूमित आपल्या लेखणीतून नेहमीच सामाजिक दायित्व जपणारे पञकार म्हणुन ओळख निर्माण केलेले राजेंद्र बनकर यांनी नवतरुणांची चांगली फळी उभी केली आहे. अनेक युवकांना माध्यमात चांगले काम करता यावे यासाठी प्रयत्नशील राहणे आणि मार्गदर्शन करणे हा त्यांचा स्वभाव असुन वीस वर्षापासुन माझ्या सहवासात त्यांनी विविध वृत्तपञात यशस्वी काम सांभाळले आहे. दै. साईसंध्या हे साईंच्या आशिर्वादाने पुन्हा वाचकांच्या सेवेत नव्या रुपाने आले याचा मनस्वी आनंद होत असुन पञकार राजेंद्र बनकर यांची या वृत्तपञास कार्यकारी संपादक म्हणुन जबाबदारी दिल्याने भविष्यात शिर्डीसह पंचक्रोशीतील वंचित आणि सामाजिक विषयावर प्रकाशझोत टाकला जाईल असे स्पष्ट केले.
अॅड. मोहसिन शेख यांनी यावेळी माध्यमातून समाजहित साधले जावे आणि आजही आपल्या निरपेक्ष लेखणीतून ते साधले जात आहे.साईबाबांमुळे शिर्डी शहराला आणि येथील घडामोडींना मोठे महत्त्व आहे. आणि दै. साईसंध्या वृत्तपञाच्या माध्यमातून तळागळातील व्यक्तींच्या समस्या मांडल्या जातील यात शंका नसल्याचे सांगत शिर्डीकरांचा नेहमीच जिव्हाळा असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दै. साईसंध्या संकेतस्थळ,वेब पोर्टल आणि शिर्डी कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले.
शिर्डी येथील हॉटेल साईराम प्लाझा येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी दै. साईसंध्या समुहाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

