अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते पूजन.
इंदापूर: प्रतिनिधी
माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री यांचे सुपुत्र आणि इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य लहान थोर नागरिकांपर्यंत नेहमी पोहोचून त्यांची विचारपूस करणारे आणि सर्वांना विषय आदरयुक्त वागून सर्वांच्या आनंदात दुःखात समाविष्ट होऊ सतत तालुक्यामध्ये कार्यरत राहणारे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे सराटी येथे रविवारी(दि.८) रोजी पूजन करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे तानाजी मिसाळ, मधुकर गायकवाड, वसंत मिसाळ, नाना वायदंडे, दत्तात्रय साठे, आप्पा वायदंडे, सोमनाथ गायकवाड, शिवाजी मिसाळ, भारत मिसाळ, दत्तात्रय मिसाळ, समाधान मिसाळ, बंडू मिसाळ, भीमराव मिसाळ, सागर सकट, नाना गायकवाड, हनुमंत मिसाळ, सूरज मिसाळ, सुदर्शन मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून राजवर्धन पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारास ने प्रेरित झालेल्या युवकांना बरोबर विचारविनिमय करण्यास मिळाल्याबद्दल या युवक वर्गाचे विशेष कौतुक केले.
फोटो :- सराटी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी राजवर्धन पाटील.

