shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोळेकर वस्ती नजीक आढळली चार वर्षीय बालिका मृतावस्थेत.. परिसरात खळबळ .

सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोळेकर वस्ती नजीक आढळली चार वर्षीय बालिका मृतावस्थेत.. परिसरात खळबळ .
इंदापूर प्रतिनिधी:(२५ ऑगस्ट २०२१) पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोळेकर वस्ती नजीक असणाऱ्या ब्राम्हण तळ ओढा परिसरात अंदाजे चार वर्ष वयाच्या बेवारस बालिकेचे मृत देह आढळून आल्याने परिसरात  खळबळ उडाली आहे.

हि घटना बुधवार (दि.२५ ऑगस्ट )रोजी दुपारी एक वाजताचे दरम्यान निदर्शनास आली. त्यामुळे ही हत्या की अन्य काही असे प्रश्न उपस्थित झाले आहे.या मृत बालिकेची ओळख अद्याप पटलेली नाही. शिवाय तिच्या मृत्यू चे नेमके कारण ही अद्याप समजलेले नाही. 

या परिसरातील स्थानिक नगरिक आपली जनावरे चारण्यासाठी या परिरसात गेले असता त्यांना हे मृत शरीर आढळून आले. त्यांनी तात्काळ याची कल्पना गावचे सरपंच सिताराम जानकर यांना दिली. जानकर यांनी तात्काळ  १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. शिवाय इंदापूर पोलीस विभागास ही याची कल्पना दिली.यानंतर सरपंच सिताराम जानकर,उपसरपंच हनुमंत जमदाडे,सदस्य सतिश चित्राव, रवींद्र सरडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.मात्र सदरची मृत बालिका स्थानिक नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार सरडेवाडी टोल नाक्याची रुग्णवाहीका व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अविनाश बोरसे,विनोद पवार व टोलचे कर्मचारी सलमान पठाण,राहुल कदम,अनिल तरंगे हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी सदरील मृत शरीर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयत येथे पुढील तजवीज कामी दाखल केले.वृत्त लिहिपर्यंत याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद झालेली नाही.सदर घटने बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
close