प्रतिनिधी । अर्पणा सुधाकर माने कोल्हापूर :-
रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट 3170 च्या बेळगाव इथे झालेल्या कार्यक्रम मध्ये कोल्हापूर मधील रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स या क्लब ला 2020-21 साली केलेल्या विविध उपक्रम बद्दल एकूण 15 पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये क्लब ला बेस्ट सेक्रेटरी, बेस्ट बुलेटिन, बेस्ट इंटरनॅशनल सर्व्हीस, सबला प्रोजेक्ट, हेरिटेज हंट, कोविड वाॅरियर असे पुरस्कार आहेत.
क्लब तर्फे कुंभारवाडी गावात एक शाळेचे बाथरूम बांधून देण्यात आले, 3 शाळेत सायकल गरजू मुलांना वाटप करण्यात आले, 4 शाळेतील गरजु मुलींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करून शाळेत सॅनिटरी सबला बँक सुरू करण्यात आली, कोविड मध्ये खेळणी विक्री करण्यार्या अंध बांधवांना धान्य किट देण्यात आले, असे विविध उपक्रम वर्षभरात क्लब तर्फे राबवण्यात आले.
बेळगाव मध्ये झालेल्या कार्यक्रम मध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड सर, past डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद कुलकर्णी सर, रोट्रॅक्ट डिस्ट्रिक्ट प्रमुख साहिल गांधी हे उपस्थित होते.

