shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साकुर पठारभागातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत शिवप्रतिष्ठाण आक्रमक....तहसीलदार,प्रांत, जिल्हाधिकारी तसेच सबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन...!


पुढील आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही करावी यासाठी आग्रही मागणी...

शिर्डी एक्सप्रेस न्युज नेटवर्क
साकुर पठार भागातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत आहेत.
 त्यामध्ये मुख्यत्वे
१.रणखांब फाटा ते दरेवाडी
२.साकुर ते नांदुरखंदरमाळ (जांबुत मार्गे)
३.साकुर ते बिरेवाडी फाटा
(१ किमीचे नवीन डांबरीकरण २ महीन्यात खड्डेमय इतर सर्व रस्ताच खड्डेमय- ४किमी)
४.मांडवे बुद्रुक ते वरवंडी
वरील निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास...खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर वृक्ष लागवड करून आंदोलन करण्यात येईल....
पुढील आठ दिवसात वरील विषयावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास साकुर पठार भागातील तमाम जनतेच्या वतीने आपणास आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. तरी सदर निवेदनावर जनसामान्यांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील, संगमनेर तालुका संघटक शिवश्री. गणेशजी श्रीराम, युवानेते निलेशजी मनसुक, डॉ.अजीत गुळवे तसेच ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

             शिवश्री राहुल ढेंबरे पाटील


दैनंदिन जिवनात खड्डेमुक्त रस्ते काळाची गरज-शिवश्री राहुल ढेंबरे पाटील

दळणवळणासाठी रस्ते हेच पठारभागाचे मुख्य स्रोत असल्यामुळे शेतकऱ्यांना मालवाहतूक, खते-औषधे आणण्यासाठी तसेच प्रवास करताना नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतली जात नसेल तर अंदोलनाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील यांनी शिर्डी एक्सप्रेस शी बोलताना केले.
close