shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कांगोणी गावातील शेतकऱ्यांना कृषिकन्याकडून शितल कक्ष प्रात्यक्षिक..!!

प्रतिनिधी, मोहन शेगर 

सोनई :- नेवासा तालुक्यातील कांगोनी येथे ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत कार्यरत असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील साईकृपा कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या प्रीतम नामदेव विरकर हिने शेतकऱ्यांना शून्य ऊर्जा शीतकक्ष प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. कृषिकन्या प्रीतम हिने शीत कक्षाची उभारणी कशी करावी ? याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर. के. एच. निंबाळकर सर कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ए.ए. शिंदे सर, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस. एस. बंडकर मॅडम, विशेष शिक्षक  प्राध्यापक एस.आउटी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.




close