नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
गुंडेगाव (दि,१४) ऑगस्ट अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष स्व. माधवराव मुळे तथा आबा यांची आज जयंती निमित्त गुंडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात वृक्ष लागवड करुन आबांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.यावेळी त्याच्या
आठवणीना उजाळा देताना मुख्याध्यापिका श्रीमती नेहूल प्रयागा म्हणाल्या की स्व.माधवराव मुळे हे ‘आबा’ या नावाने परिचित होते. नगर तालुक्यातील वाटेफळ या छोट्याशा गावात माधवराव मुळे तथा आबा यांचा १९३२ साली जन्म झाला.त्यांनी गावातच किराणा दुकान सुरु केले होते. १९४७ साली झालेल्या रझाकार चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर १९५२ मध्ये नगरमध्ये येत आडत व्यवसाय सुरु केला. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय झाले. या कालावधीत डाव्या विचारांशी जोडले गेले. १९५८ मध्ये अहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष पदही भुषविले. त्यानंतर अहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेच्या शिवाजी ग्राहक भांडारचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९८० साली संस्थेचे सहसचिव झाले होते.त्यानंतर जिल्हा मराठा संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले होते. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते.
अनेक परदेशी दौरेही त्यांनी केले. १० एप्रिल २०१२ रोजी ते जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष झाले. सलग सहा वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.तसेच गुंडेगावची शाळेची उभारणी त्यांनी केली आहे.असे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थितांमध्ये शाळेचे शिक्षक परशुराम साबळे, सागर भोईटे. बाळासाहेब वाळके, संतोष मगर, सोपान भापकर. अनिल कोतकर. प्रिया खडके, सुरेखा जाधव, ज्योती शिपणकर,शुभांगी पारेकर, श शितल थोरवे.दादासाहेब आगळे उपस्थित होते...



