श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराच्या कलशारोहण समारंभास भेट देऊन दर्शन घेऊन मंदिर परिसरातील पाहणी केली.
इंदापूर प्रतिनिधी: (२७ ऑगस्ट२०२१)महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर येथे प्रसिद्ध श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराच्या कलशारोहण समारंभास शुक्रवार (दि. २७) रोजी भेट दिली. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी कलशाची पूजा करुन दर्शन घेतले. तसेच त्यांनी लक्ष्मीनृसिंह यांचे दर्शन घेऊन "या राज्यावर तसेच या देशावर संपूर्ण जगावर आलेले संकट नष्ट होऊ दे व दमदार पाऊस पडून बळीराजाच्या शेतात भरघोस पिक येऊ दे "असे साकडे घातले.
श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाते. लक्ष्मीनृसिंह विकास आराखडास मोठा निधी मिळाल्याने येथील विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. कलश रोहनाचे कार्यक्रम आज धार्मिक विधींनी विधिवत पणे पार पाडण्यात आला. या भेटीमध्ये भरणे यांनी लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तां बरोबर चर्चा केली व मंदिर जीर्णोद्धार कामाची पाहणी केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रशांत पाटील, श्रीकांत बोडके, श्रीकांत दंडवते ,गौरव दंडवते, दत्तात्रय घोगरे, जगदीश सुतार, अण्णा काळे, नवनाथ रुपणवर ,नरहरी काळे ,दत्तामामा घोगरे ,नागेश गायकवाड ,अरुण क्षीरसागर ,दादा शिरसागर, शंकर राऊत तसेच पंचक्रोशीतील सर्व मंडळी उपस्थित होती.

