shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिलीप भोसलेंवर शिवसेनेची मोठी जबाबदारी; शिव अंगणवाडी सेना मराठवाडाप्रमुखपदी नियुक्ती!!

प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधी :-

हिंदुर्‍हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेनापक्षप्रमुख मा.श्री.उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव अंगणवाडी सेनेच्या अध्यक्षा सारिकाताई सावंत थडानी यांनी दिलीप ज्ञानदेव भोसले यांची महाराष्ट्र शिव अंगणवाडी सेना मराठवाडाप्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.





संघटनेची ध्येय, धोरणे आणि कार्यक्रम आपण वेळोवेळी निष्ठेतेने राबवावे, तसेच आपण व आपल्या सहकार्‍यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव पोहचणार नाही याची काळजी घ्यावी असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

दिलीप भोसले यांचे काम अंगणवाडी मदतनिस सेविका आशा वर्कर यांच्यासाठी उल्लेखनीय काम केले असून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर उतरून काम केले आहे. वेळ प्रसंगी काठ्या-लाठ्या खावून पण सर्व सामान्य लोकांच्या हिताचे काम करणारं निराधारांचे नेतृत्व अशी ओळख असणारे दिलीप भोसले यांनी काम केले आहे. शिवसेनेच्या माध्यमातुन येणार्‍या काळात मराठवाड्यात मदतनीस सेविका आशा वर्कर यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या मागण्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून दिलीप भोसलेंच्या माध्यमातुन आम्हाला न्याय मिळेल अशा भावनाही अंगणवाडी ताईंकडून व्यक्त होत आहेत. 

सदरील निवडीचे नांदेड, बीड, हिंगोलीचे संपर्क प्रमुख मा.आनंदरावजी जाधव साहेब, महाराष्ट्राचे माजीमंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर, जिल्हाप्रमुख कुंडलिक बापु खांडे, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी मंत्री बदामराव पंडित, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब आंबुरे, योगेश भैय्या क्षीरसागर, अनिल दादा जगताप, बाळासाहेब पिंगळे, अरूण नाना डाके, सचिन मुळूक, संगिता चव्हाण, उज्वला भोपळे, गोरख सिंगण,सुनिल सुरवसे, परमेश्वर सातपुते, विलास बडगे, दिलीप गोरे, अनिल गायसमुद्रे, संघमित्रा शेजवळ आदिंनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

close