मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य आधिकाऱ्याकडे श्रीराम तांदळे यांनी संबंधीत सामाजिक संस्थेची चौकशी करण्याची मागणी केली आहे..
नवचेतना सर्वांगिण विकास केंद्र गोरगरीबांचा तळतळाट, पाप कसे फेडणार- श्रीराम तांदळेंचा संतप्त सवाल..
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
कोरोनाच्या कार्यकाळात गोरगरीब गरजवंत जनता संकटात आसल्याने मोठ-मोठ्या सामाजिक संस्थेकडून तालुक्याच्या ठीकाणी कार्यरत असणार्या संस्थेकडे फंडींग स्वरूपात कोट्यावधी चा निधी मदत स्वरूपात दिला त्याचा काही संस्थेने चांगल्या प्रकारे उपयोग करत जनतेला धीर, आधार दिला आहे.परंतु या सर्व गोष्टीला केजच्या सामाजिक संस्था नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राने मांजराने डोळे झाकून दुधावर ताव मारावा अगदी तशाच पद्धतीने अगदी पद्धतशीरपणे फंडीग स्वरूपात प्राप्त झालेल्या निधीचा दुरुपयोग करत थेट डल्ला मारून घशात घातल्याचा आरोप श्रीराम तांदळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे कडे आरोप केला आहे.
गोरगरीब जनतेला मदत व्हावी या उद्देशाने सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्थाचे कार्य तसे चांगले आहे.परंतू केज तालुक्यात सामाजिक कार्यात काम करणार्या नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र या सामाजिक संस्थेने इतर सामाजिक संस्थेने केलेली मदतसुद्धा अक्षरशः गडप केली गरजुवंत,गोरगरीब,विधवा, परित्यक्ता, दिनदुबळ्या, शेतमजूर, कष्टकरी जनतेसाठी फंडीग स्वरूपात आलेल्या निधीतून कोरोना काळात कामधंदा बंद असलेल्या मजुरांना व अगदी संसार उघड्यावर आलेल्या कुटुंबांना मदत करण्याऐवजी फंडींग स्वरूपात आलेल्या निधीवरच डल्ला मारल्याचे युवा नेते श्रीराम तांदळे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.तसेच कोरोनाच्या कार्यकाळात गोरगरीब जनतेसाठी कोव्हिड केअर सेंटर सुरू करणे,विलिगी करण कक्ष सुरू करून गोरगरीब जनतेला मदतीचा आधार मिळावा या उद्देशाने देशातील सामाजिक संस्थांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासून गोरगरीब,कष्टकरी,गरजवंतासाठी त्या त्या भागातील संस्थेकडे कोट्यवधी रूपयांचा निधी फंडींग स्वरूपात पाठवला,परंतु केजच्या नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र या संस्थेने त्याचा योग्य वापर करण्यापेक्षा मोठया प्रमाणावर आपहार केला आसून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कोरेगाव चे श्रीराम तांदळे यांनी बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी,बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राने कोरोनाच्या कार्यकाळात गोरगरीबांसाठी फंडीग स्वरूपात मिळालेल्या कोट्यावधी रूपयांच्या निधीवर डल्ला मारला हे अगदी सत्य आसून गोरगरीबांच्या तोंडातील घास काढून या संस्थेने केलेले पाप कसे फेडणार अशी संतप्त प्रतिक्रिया श्रीराम तांदळे यांनी दिली आहे.
आम्ही नवचेतना सामाजिक संस्थेच्या मनिषा घुले यांना या बद्दल प्रतिक्रिया साठी संपर्क केला असता त्यांनी फोन कट केला व पुन्हा संपर्क केला असता त्यांनी फोन स्विच आॅफ ( बंद) केला. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया भेटू शकली नाही.

