shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली राज्यपालांची भेट

सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल मंजूर करण्याच्या मागणी संदर्भात घेतली राज्यपालांची भेट.


 इंदापूर प्रतिनिधी: (४ ऑगस्ट २०२१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल मंजूर करण्याच्या मागणी संदर्भात सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची बुधवारी ( दि.४ ) भेट घेतली.

महाराष्ट्र लोकसेकसेवा आयोगाच्या ४ रिक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल मंजूर करण्याच्या मागणी संदर्भात राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.एम पी एस सी च्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची मुलाखत प्रक्रिया पार पडणे गरजेचे आहे. या मुलाखत प्रक्रियेला वेग येण्यासाठी आयोगातील रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे. 

म्हणून यानिमित्ताने सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन एम पी एस सी च्या ४ सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी,अशी मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्यपालांनी तातडीने फाईलला मंजुरी देऊन ती सरकारकडे पाठवणार असल्याचे सांगितले असल्याची माहिती आहे.

close