shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी मुजावर यांची नियुक्ती झाल्याबद्दल अमोलराजे इंगळे यांच्या वतीने सत्कार.

इंदापूर पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी मुजावर यांची नियुक्ती झाल्याबद्दल  अमोलराजे इंगळे  यांच्या वतीने सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: (२९ ऑगस्ट २०२१)इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक या पदावर तयुब युनुस मुजावर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व स्वागत  पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष अमोलराजे इंगळे यांच्यावतीने(दि.२९) रोजी करण्यात आला.
यावेळी सत्कार करताना इंदापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक मुजावर म्हणाले की, इंदापूर तालुक्यात वाढत्या कोरोनाचा विचार करता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन इंदापूरकरांनी तंतोतंत पाळावे . तसेच शिस्तबद्ध इंदापूरकर म्हणून नावलौकिकता व्हावी यासाठी इथून पुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी पोलीस हवलदार रासकर,  मड्डी, पोलीस नाईक चौधर, पोलीस कॉन्स्टेबल भालसिंग, तसेच निलेश फलफले, आबासाहेब गंगावणे, नारायण आसबे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यासाठी कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याबरोबर इंदापूर पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष कर्तबगार पोलीस निरीक्षक तयुब मुजावर हे मिळाले त्याबद्दल त्यांचे   पोलीस फ्रेंड वेलफेअर असोसिएशन इंदापूर तालुका अध्यक्ष या नात्याने स्वागत करून अभिनंदन करणे हे माझे कर्तव्य समजतो.
close