shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जळगाव जिल्ह्यातील भाजीपाल्यांचे दर कडाडले; कोथंबिरीचे व मेथी चे दर दुप्‍पट...!!

प्रमोद चौधरी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी
९९६०५९५८०७


 एरंडोल:-जळगाव जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. तत्पुर्वीच पालेभाज्याचे दरात वाढ झाली आहे. यात कोथबिरचे दर तब्‍बल ८० रूपयांवर पोहचले आहेत. 
जिल्ह्यात जुन महिन्यात एक किंवा दोनदा दमदार पाऊस झाला. त्यानंतर अद्याप हवा तसा पाऊस झालेला नाही. मात्र श्रावण महिन्यात समाधान कारक पाऊस होईल अशी अपेक्षा आहे. याचा परिणाम आता पालेभाज्यांचे भाव ही कडाकडले आहे.
मेथी व कोथिंबीरचे दर दुप्‍पट

पावसाळ्यापुर्वी मिळणारी ४० रूपये किंमतीची कोथबीर आता बाजारात तब्बल ८० रूपयापर्यंत पोहचली आहे. मात्र काही भाज्याचे दर आजही स्थिरत असल्याने सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. कोथबीरचे भाव तर डबल झाले आहेत. मेथीही २० रुपयांवरुन ३० वर पोहचली आहे. मात्र काही भाज्यांचे भाव स्थिर असल्यामुळे आवक्यातील असल्याने सर्वसामान्यांना पालेभाज्या खाता येत आहे.
close