shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा अपंग (दिव्यांग) पुनर्वसन केंद्रातर्फे 1 ते 25 ऑक्टोबर दरम्यान वयोश्री योजनेंतर्गत मोफत तपासणी शिबीर..!


 

अहमदनगर दि. 29 :-  भारत सरकार, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत 60वर्षावरील सर्व नागरीकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत मोफत सहायक साधाने वाटपासाठी तपासणी शिबीर डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा अपंग (दिव्यांग) पुनर्वसन केंद्र, अहमदनगर व जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर2021 या कालावधीत शिबिराचे आयोजन अहमदनगर जिल्हयात करण्यात आलेले आहे.

            राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत मोफत सहायक साधने वाटपासाठी तपासणी शिबीरामध्ये 60 वर्षावरील सर्व नागरिकांची तपासणी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या तज्ञामार्फत करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये पात्र नागरिकांना नंबरचा चस्मा, काठी, श्रवण यंत्र,कृत्रिम दात,कुबड्या, वॉकर,व्हील चेअर,व्हील चेअर (कमोड), गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा,पाठीचा पट्टा, सिलिकॉन बूट इनसोल इत्यादी साधने मोफत वाटपाचा दिनांक पात्र नागरिकांना भ्रमणध्वनीव्दारे अवगत करण्यात येईल.

            सदर योजनेसाठी  नागरिकाचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त,वार्षिक उत्पन्न 1,80,000/- पेक्षा कमी,आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, दोन पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. शिबीराचे  तालुका, ठिकाण व दिनांक पुढील प्रमाणे. पारनेर तालुक्यात 1 ते 2ऑक्टोबर 2021 रोजी सेनापती बापट विद्यालय, पंचायत समिती शेजारी, राहुरी तालुक्यात 3 ते 4 ऑक्टोबर 2021रोजी प्रगती विद्यालय, शुक्लेश्वर चौक,   पाथर्डी तालुक्यात  5 ते 6ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा परिषद शाळा (मुले), मेनरोड नाईक चौकाजवळ,  शेवगाव तालुक्यात  7 ते 8ऑक्टोबर 2021 रोजी संत एकनाथ आयुर्वेदिक कॉलेज आखेगाव रोड,कर्जत तालुक्यात  9 ते 10 ऑक्टोबर2021 रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय,कुळधरण रोड, श्रीगोंदा  तालुक्यात  11ते 12 ऑक्टोबर 2021 रोजी होनराव माध्यमिक विद्यालय, जामखेड तालुक्यात  18 ते 19 ऑक्टोबर 2021रोजी जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा मराठी (मुले),  नगर  तालुक्यात  20 ते21 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिचोंडी पाटील,अहमदनगर,  नगर शहर  22 ते 23ऑक्टोबर 2021 रोजी अर्बन हेल्थ सेंटर,टिव्ही सेंटर जवळ, सावेडी,अहमदनगर,  भिंगार  24 ऑक्टोबर2021 रोजी कॅन्टोन्मेंट स्कुल,भिंगर,  केडगाव 25 ऑक्टोबर 2021रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अहमदनगर.

            डॉ. अभिजित दिवटे, संचालक जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, विळदघाट,राधाकिसन देवढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,वैद्यकिय समान्वयक डॉ. दिपक अनाप व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रशासकीय समन्वयक डॉ. अभिजित मेरेकर यांनी अहमदनगर जिल्हयातील जास्तीत जास्त 60 वर्षावरील नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

                         
close