shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कु. आर्या डुबे माझा बाप्पा उपक्रमाचे सर्वञ कौतुक: स्वता गणेशमुर्ती तयार करुन होते स्थापना..!!

शिर्डी । प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पेमगीरी या गावातील इयत्ता सातवीत शिकणारी कु आर्या दिपक डुबे ही डेरे इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शिक्षण घेत आहे. शाळेत विविध स्पर्धा मध्ये भाग घेणाऱ्या आर्याला  कोरोनामुळे अनेक स्पर्धेला मुकावे लागले माञ दरवर्षी प्रमाणे तिने नेहमीप्रमाणेच स्वता गणपती मुर्ती बनवून आपल्या गावाचे आणि गणेश भक्तांचे लक्ष वेधले आहे. 



घरीच तिने सुंदर सुबक अशी गणरायाची मुर्ती साकारली असुन तिच्या या कलेचे कौतुक केले जात आहे. शिर्डी येथील साई सिद्धी रिक्षा संघटना साईभक्त निवास चे उपाध्यक्ष गणेश सावंत यांची ती भाची असुन शिर्डीतील ग्रामस्थांनीही तिच्या या कलेबद्दल कौतुक केले आहे. डुबे कुटुंबात दरवर्षी आर्याने तयार केलेली गणेशमुर्तीची स्थापना केली जात असुन या  माझा बाप्पा उपक्रमास आर्याचे कुटुंब चर्चेत आले आहे.

close