shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तहसील कार्यालय समोर एसटी बस थांबणार..शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या वतीने दिलेल्या निवेदन पत्रानुसार आगार व्यवस्थापकांनी बस थांबा बद्दल दिला शब्द.

इंदापूर तहसील कार्यालय समोर एसटी बस थांबणार..

शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्या वतीने दिलेल्या निवेदन पत्रानुसार आगार व्यवस्थापकांनी बस थांबा बद्दल दिला शब्द.

इंदापूर प्रतिनिधी: (२१ सप्टेंबर २०२१) इंदापूर तालुक्यातील अनेक वयोवृद्ध महिला व पुरुष तसेच दिव्यांग लोक तहसील कचेरी समोर एसटी बस थांबत नसल्याने मुळे त्यांना खूप त्रास होत असल्याचे तक्रारी घेऊन शिवसेना संपर्क कार्यालयांमध्ये समक्ष येऊन व फोन द्वारे आमच्या कडे तहसील कचेरीच्या समोर एसटी बस थांबविण्यासंदर्भात विनंती केली आहे. तरी दिव्यांग व वृद्ध लोकांना बस स्टॅन्ड वरून कचेरी कामासाठी येताना व जाताना खूप त्रास होत आहे. त्यामुळे आपल्या एसटी डेपोतील गाड्यांना आपल्या स्तरावर तहसील कचेरीसमोर एसटी बस येताना व जाताना थांबवण्यासाठी सूचना देण्यात याव्यात व होणाऱ्या नागरिकांची गैरसोय थांबवावी असे आशयाचे पत्र इंदापूर आगार व्यवस्थापक यांना दि२१ सप्टेंबर २०२१ रोजी इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिले.

  शाखा व्यवस्थापक मनिर यांना विचारले असता त्यांनी सदर तहसील कचेरीसमोर बस गाड्या येताना व जाताना थांबतील  व ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना एसटी बस च्या माध्यमातून त्यांना नेहमी सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.
close